नवी दिल्ली 31 मे : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून नेटकऱ्यांना घाम फुटतो आणि अक्षरशः थरकाप उडतो. आजकाल अशा अनेक लोकांच्या आश्चर्यकारक कारनाम्यांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की एक महिला महाकाय वाघासोबत मस्ती करताना दिसत आहे. जे पाहून युजर्सही हैराण झाले. अलीकडच्या काळात अनेक लोक सिंह, वाघ , पँथर यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांनाही पाळीव प्राणी बनवून त्यांचा सांभाळ करताना दिसतात. मात्र, या प्राण्यांचा मूड कधी बदलेल आणि ते कधी आपल्या मालकावरच हल्ला करतील, हे कोणीही सांगू शकत नाही. अशा अनेक घटना समोरही आल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीत त्यांच्या मालकांनी त्यांच्यासोबत खेळताना खबरदारी घेणं आवश्यक असतं. मात्र सध्या अजब पराक्रम करणारी एक मुलगी आपल्या धाडसाने सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. Bear Attack Video : मानवी वस्तीत शिरलं भलंमोठं अस्वल; लोकांवर करू लागलं हल्ला अन् मग.. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. @Figensport नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी जमिनीवर झोपलेली दिसत आहे. त्या दरम्यान एक महाकाय भयानक वाघ देखील त्या तरुणीच्या अंगावर आरामात बसलेला दिसतो. वाघ समोर येताच कोणचााही थरकाप उडतो आणि लोक जीव मुठीत घेऊन धावत सुटतात, तिथे ती तरुणी मात्र आरामात पडून फोटो काढताना दिसते.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. जो बातमी लिहिपर्यंत 8 लाख 53 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 3 हजारांहून अधिक यूजर्सनी लाइक केला आहे. थक्क झालेले यूजर व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करून तरुणीला खरी सिंहीण म्हटलं आहे. तर, बहुतेक वापरकर्त्यांचे म्हणणं आहे की वाघासोबत असं फोटोशूट करणं जीवावर बेतू शकतं.