जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Bear Attack Video : मानवी वस्तीत शिरलं भलंमोठं अस्वल; लोकांवर करू लागलं हल्ला अन् मग..

Bear Attack Video : मानवी वस्तीत शिरलं भलंमोठं अस्वल; लोकांवर करू लागलं हल्ला अन् मग..

मानवी वस्तीत शिरलेल्या अस्वलाचा हल्ला

मानवी वस्तीत शिरलेल्या अस्वलाचा हल्ला

पाच जण घराच्या छतावर चढून त्याला पकडण्यासाठी जाळी पसरवताना दिसत आहेत. मात्र अचानक अस्वल रागाने छतावर चढतं आणि सर्वांवर हल्ला करायला त्यांच्या मागे धावू लागतं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 31 मे : वाढत्या लोकसंख्येमुळे मानव जंगलांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे जंगलांचं क्षेत्र सतत कमी होत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा भटके वन्य प्राणी मानवी वस्तीत येताना दिसतात. ज्यामध्ये क्रूर प्राणी अनेकदा रागाच्या भरात माणसांवर अचानक हल्ला करताना दिसतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये असं दृश्य पाहून वापरकर्त्यांच्या अंगावरही काटा आला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय अस्वल माणसांवर हल्ला करताना दिसत आहे. ज्याला यूजर्स एका वाईट स्वप्नासारखी घटना असल्याचं म्हणत आहेत. सहसा असे मोठे अस्वल अलास्काच्या जंगलात आढळतात. ज्यांच्यात कोणत्याही माणसावर हल्ला करून त्याला एकाच हल्ल्यात संपवण्याची ताकद असते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे अस्वल मानवी वस्तीत कहर करताना दिसत आहे. धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडून घेतली उडी; व्यक्तीसोबत पुढे काय झालं तुम्हीच बघा, Video हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला जात आहे. जो @TheFigen_ नावाच्या प्रोफाइलवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अस्वल मानवी वस्तीत दहशत निर्माण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे पाच जण घराच्या छतावर चढून त्याला पकडण्यासाठी जाळी पसरवताना दिसत आहेत. मात्र अचानक अस्वल रागाने छतावर चढतं आणि सर्वांवर हल्ला करायला त्यांच्या मागे धावू लागतं. ज्यानंतर प्रत्येकजण जीव वाचवून पळताना दिसत आहे.

जाहिरात

सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडिओला ही बातमी लिहिपर्यंत एक लाख 84 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून या घटनेत पुढे काय झालं हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. वापरकर्ते व्हिडिओवर त्यांच्या कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं की, ‘छतावरून उडी मारल्यानंतर काय झालं असेल, याचा मी विचार करत होतो.’ दुसर्‍याने असा दावा केला, की ही घटना किर्गिस्तानमध्ये घडली, ज्यात अस्वलाने हल्ला केला आणि एका माणसाला खाल्ले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात