• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आजारी मुलीच्या आनंदासाठी आईनं घेतला मोठा निर्णय; वयाच्या 53 व्या वर्षी स्वतः दिला नातीला जन्म

आजारी मुलीच्या आनंदासाठी आईनं घेतला मोठा निर्णय; वयाच्या 53 व्या वर्षी स्वतः दिला नातीला जन्म

आईला जेव्हा समजलं की तिची मुलगी बाळाला जन्म देऊ शकत नाही आणि तिच्या जीवाला धोका आहे तेव्हा आईनं मोठा निर्णय घेतला. आता या महिलेनं आपल्या नातीला जन्म दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 29 ऑगस्ट : आईची (Mother) तुलना ही देवासोबत केली जाते. याचं कारण हेच आहे की आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका आईची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral News) होत आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, एका आईनं आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आपल्याच मुलीच्या मुलीला जन्म दिला (Woman Gave Birth to Granddaughter). द सननं दिलेल्या वृत्तानुसार, आईला जेव्हा समजलं की तिची मुलगी बाळाला जन्म देऊ शकत नाही आणि तिच्या जीवाला धोका आहे तेव्हा आईनं हा निर्णय घेतला. आता या महिलेनं आपल्या नातीला जन्म दिला आहे. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ब्राझीलमधील आहे. इथे एका आजीनं आपल्या नातीला जन्म देऊन हे सिद्ध केलं की आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते. हे संपूर्ण प्रकरण ब्राझीलच्या सेंट कटरीना शहरातील आहे. यात एका 53 वर्षाच्या रोजिकलिया डी अब्रू कार्सेम या महिलेनं आपल्या मुलीच्या मुलीला जन्म दिला. ही बातमी ऐकून सगळेच थक्क झाले. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. शेतातच आपसात भिडल्या दोन महिला; हाणामारीचा VIDEO होतोय व्हायरल रोजिकलिया डी अब्रू कार्सेम यांना 29 वर्षाची मुलगी आहे. तिला 2014 पासून पल्मनरी एम्बॉलिज्म नावाचा आजार आहे. या आजारात रक्ताच्या गाठी शरीरात जमा होतात. अशात डॉक्टर प्रेग्नंसीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. त्यामुळे रोजिकलिया यांची मुलगी गरोदर राहिल्यास तिच्या जीवाला धोका होता. मात्र, याबद्दल जेव्हा तिच्या आईला माहिती झालं तेव्हा आईनं असा निर्णय घेतला जो कौतुकास्पद आहे. VIDEO: दिमाखात करत होता स्टंट; युवकासोबत घडलं असं काही ज्याची कल्पनाही केली नसेल आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना रोसिकलिया यांनी सांगितलं, की त्यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आपल्या मुलीसाठी त्यांनी हे केलं. रोसिकलिया म्हणाल्या की मी भाग्यवान आहे की मी माझ्या मुलीला आणि नातीलाही जन्म देऊ शकले. रोसिकलिया यांच्या मुलीचं नाव इन्ग्रिड आहे आणि तिच्या पतीचं नाव फॅबिआना आहे. दोघंही आपल्या मुलीच्या जन्मानंतर अतिशय आनंदी आहेत. IVF च्या मदतीनं या बाळाचा जन्म झाला आहे. यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च आला. हे पैसे क्राउडफंडिंगद्वारे जमवण्यात आले.
  Published by:Kiran Pharate
  First published: