Home /News /viral /

रुग्णालयात पोहोचण्याआधीच होऊ लागल्या प्रसूती वेदना अन् मग..; Cab Driver ने जे केलं ते मन जिंकणारं, VIDEO

रुग्णालयात पोहोचण्याआधीच होऊ लागल्या प्रसूती वेदना अन् मग..; Cab Driver ने जे केलं ते मन जिंकणारं, VIDEO

उबर कॅब चालवणाऱ्या रेमंड यांनी सांगितलं की एक दिवस एका दाम्प्त्याने कॅब बूक केली. चालक कॅबमध्येच बसून त्यांची वाट बघत होता, इतक्यात प्रेग्नंट महिला एरिका डेविडोविच आपला पती निव याच्यासोबत आली आणि कॅबमध्ये बसली.

    नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : मूल जन्माला येणं हा निसर्गाचा सर्वात मोठा करिष्मा म्हटल्यास वावगं ठरणार नाही. माणूस असो वा इतर प्राणी, पोटात मूल वाढण्यापासून (Pregnancy) ते या जगात येईपर्यंत आई अनेक टप्प्यांतून जात असते. त्या आनंदाच्या क्षणाची वाट पाहण्यात कितीही त्रास कमी वाटतात. अशाच एका गरोदर महिलेनं पोटात दुखू लागताच रुग्णालयात जाण्यासाठी कॅब बूक केली. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. महिलेची अवस्था पाहून कॅब ड्रायव्हरने हुशारी दाखवली आणि काहीच वेळात कॅबच्या मागील सीटवरच महिलेनं बाळाला जन्म दिला (Woman Gave Birth to Baby in Cab). कॅबमध्येच महिलेला लेबर पेन होताच कॅब ड्रायव्हर रेमंड टेलेसने दाम्पत्याला सांभाळून घेतलं आणि पॅनिक होऊ दिलं नाही. यासाठी नवजात बाळाच्या वडिलांनी चालकाचे आभार मानले आहेत. 5 वर्षाच्या रिलेशननंतर केलं लग्न, पण पतीचं ते समजताच हादरली नवरी; दिला घटस्फोट उबर कॅब चालवणाऱ्या रेमंड यांनी सांगितलं की एक दिवस एका दाम्प्त्याने कॅब बूक केली. चालक कॅबमध्येच बसून त्यांची वाट बघत होता, इतक्यात प्रेग्नंट महिला एरिका डेविडोविच आपला पती निव याच्यासोबत आली आणि कॅबमध्ये बसली. तिला रुग्णालयात जायचं होतं. मात्र रस्त्यात असतानाच महिलेची प्रकृती बिघडू लागली आणि ती जोरजोरात ओरडू लागली. ती रुग्णवाहिका बोलावण्यास सांगू लागली. ती अतिशय वेदनेत होती आणि रुग्णालय अजून दूर होतं. या परिस्थिती नेमकं काय करायचं, हेच समजत नव्हतं. कॅब ड्रायव्हरने सतर्कता दाखवत गाडी काही अंतरापर्यंत नेत पार्क केली. कोणाला काही कळण्याच्या आतच बाळ बाहेर येऊ लागलं होतं. अशा परिस्थितीत चालक रेमंडने हिंमत दाखवत शांततेच सगळं काही हाताळण्याचा प्रयत्न केला. काहीच पर्याय न दिसल्याने त्याने दाम्प्त्याला कॅबमध्येच एकटं सोडलं आणि कॅबच्या बाहेर वाट पाहू लागला. काहीच मिनिटांमध्ये महिलेनं एका बाळाला जन्म दिला. चिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरुणाने स्वतःला आगीत झोकलं; अंगावर काटा आणणारा VIDEO निव आता पिता बनला आहे. त्यांचं मूल एका कॅबमध्ये जन्माला आलं आहे. कॅब चालकाने या परिस्थितीत या दाम्प्त्याला मोठा आधार देत धैर्याने योग्य निर्णय घेतला, यासाठी त्याचं कौतुक होत आहे. बाळाच्या जन्मानंतर पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pregnant woman, Small baby

    पुढील बातम्या