लंडन, 01 फेब्रुवारी: जुगार (Gambling) खेळताना खूप पैसे हरल्यानं एखादी व्यक्ती दिवाळखोर झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळ गोष्ट सांगणार आहोत. एक महिला जुगार खेळून कोट्यवधी रुपये जिंकली, पण त्या दिवशी जुगारमध्ये पैसे (Money) जिंकण्याचं दुःख तिला आजही आहे. आता तुम्ही म्हणाल की पैसे जिंकल्यानंतर कोणी दुःखी का बरं होईल? द सनने दिलेल्या वृत्तानुसार, 48 वर्षीय लिसा वॉकरने एका दिवसात जुगारात 1 कोटी 27 लाखांहून अधिक रुपये जिंकले होते. लिसा म्हणाली, तिने फेब्रुवारी 2001 मध्ये एका कॅसिनोमध्ये 1 कोटी 27 लाख रुपये जिंकले होते. जिंकल्यानंतर, तिथल्या सर्वांनी तिचे अभिनंदन केले. तिने कॅसिनो जॅकपॉट जिंकला यावर तिचा स्वतःवरही विश्वास बसत नव्हता. सगळे ओरडत होते आणि अनोळखी लोक सुद्धा तिचं अभिनंदन करत होते. पण लिसाच्या मते, ज्या दिवशी ती जॅकपॉट जिंकली तो दिवस तिच्यासाठी सर्वांत वाईट दिवस होता. यानंतर ती आणखीनच जुगार खेळू लागली, असं तिचं म्हणणं आहे. तिला जुगाराचं एवढं व्यसन लागलं होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री देखील जुगार खेळत होती. पूर्वी ती आठवड्यातून 4 ते 5 वेळा जुगार खेळायला जायची. पण जिंकल्यानंतर ती 8 ते 10 तास कॅसिनोमध्ये राहायची. “मला तिथलं वातावरण खूप आवडू लागलं होतं. त्यादिवशी मी 1 कोटींहून अधिक जिंकले असले तरी हे सगळे पैसे जुगारातही परत जात होते, हे मला कळत नव्हतं. गेल्या पाच वर्षांत माझे तब्बल 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.” गेल्या 20 वर्षांत तिने तिनदा घर गहाण ठेवलं होतं. एक वेळ तर अशी आली की, तिला घरदेखील विकावं लागलं. हे वाचा- कुत्र्याची हिंमत पाहून सिंह-सिंहिणीलाही फुटला घाम; हा Video देऊन जातोय मोठा धडा कहर म्हणजे लिसा तिच्या लग्नाच्या (wedding night) पहिल्या रात्रीदेखील जुगार खेळत होती. 2018 मध्ये, लिसाचा तिसरा नवरा गॅरीला वाटलं की त्याला खरोखर मदतीची गरज आहे. कारण लिसा तिच्या लग्नाच्या रात्री लास वेगासमध्ये सकाळी 6 वाजेपर्यंत जुगार खेळत होती. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यानंतर तेथून परतल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील गॅमकेअर नावाच्या संस्थेशी संपर्क साधला. जे लोक जुगाराच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करतात. हे वाचा- रक्षकाचा घेतला जीव; मग जोडीदारासोबत प्राणिसंग्रहालयातून फरार झाली सिंहीण अन्.. नंतर लिसाला जुगाराच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी गॅमकेअर नावाच्या संस्थेत पाठवण्यात आलं. या ठिकाणी लिसाने आपल्या जुगाराच्या व्यसनाची गोष्ट सांगितली. आजही जॅकपॉट जिंकलेल्या त्या दिवसाच्या आठवणीने मी निराश होते, असं लिसा सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.