बाली, 29 मार्च : कधी कधी आपण एखादी अशी चूक करतो जिच्या परिणामांचा आपल्याला अगदी अंदाजच येत नाही. असंच काहीसं झालं एका इंग्लंडच्या राहणाऱ्या महिलेसोबत. (blue ringed octopus)
ही महिला सुट्ट्या घालवण्यासाठी इंडोनेशियाला गेली होती. यादरम्यान इंडोनेशियाच्या बालीमध्ये तिनं सहजपणे एक कृती केली. मात्र आपण नक्की काय करतोय आणि त्यातून काय उद्भवू शकेल याची तिला अजिबातच जाणीव नव्हती. (woman puts blue ringed octopus on her palm)
या महिलेनं आपल्या तळहातावर एक लहानसा, साधा, निरुपद्रवी दिसणारा सुंदर किडा उचलून घेतला. मात्र या महिलेला त्या किड्याबाबत काहीच माहिती नव्हती. हा किडा मोहक दिसत असला तरी तो इतका धोकादायक आहे. (woman unknown of danger of blue ringed octopus picks it)
हेही वाचा Man Vs Dog : अनोख्या Volleyball मॅचमध्ये खरा खिलाडी कोण? VIDEO पाहून सांगा
महिला या सगळ्याबाबत अगदीच अनभिज्ञ होती. तिला अजिबातच माहीत नव्हतं की हा सुंदर दिसणारा किडा इतका धोकादायक आहे, की तो काही मिनिटातच तब्बल 26 लोकांचा जीव घेऊ शकतो. या महिलेचं नाव आहे केलीन. या केलीननं आपला अनेक व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तिच्या हातात ब्लू रिंग्ड ऑक्टोपस नावाचा जीव दिसतो आहे. (at Bali beach woman picks up blue eyed octopus)
याच्याविषयी समजून घेण्यासाठी केलीन गूगल सर्च करते. पाहते, की हा जीव एका मिनिटात 26 लोकांना मारू शकतो. हो, हे खरं आहे. जगात असे अनेक सुंदर जीव आहेत जे आपल्या सौंदर्यानं लोकांना मोहात पाडतात. या जीवांना पाहून असं वाटतं, की हे जणू एखाद्या परग्रहावरून इथे अवतरले आहेत.
हेही वाचा माजी महापौर असलेल्या आमदार पत्नीचं गाणं सोशल मीडियावर VIRAL
यातील काही दिसयला अगदीच मोहक असतात. मात्र अत्यंत धोकादायक आणि विषारी असण्याचा त्यांचा गुण लोकांना माहीत नसतो. जगभरात ऑक्टॉप्स च्या 300 हून जास्त जाती आहेत. यात ब्लू रिंग्ड ऑक्टोपस सर्वाधिक धोकादायक आणि विषारी आहे. असं म्हटलं जातं, की याचं विष माणसाला 30 सेकंदातच मारून टाकू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.