व्हॉलीबॉल ज्यात हातांचा वापर केला जातो. कुत्रा मात्र आपल्या तोंडाने अगदी मस्त हा व्हॉलीबॉल खेळताना दिसतो आहे. अगदी सफाईदारपणे तो खेळतो आहे. जणू काही तो अगदी उत्तम असा तयार झालेला खेळाडू आहे. माणूस आणि कुत्रा दोघंही एकमेकांकडे बॉल झेलवतात. व्हिडीओ पाहता पाहतात आता नेमकं कोण जिंकणार आणि कोण हरणार याची उत्सुकता वाढत जाते. हे वाचा - माणसांनाही लाजवेल असं भटक्या कुत्र्यांनी केलं काम; VIDEO पाहून कराल सलाम व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला खरा विजेता कोण ते कळेल. व्हॉलीबॉलची ही स्पर्धा चक्क जिंकली ती कुत्र्याने. त्याने माणसांनी माणसांसाठी तयार केलेल्या या खेळातही माणसांना हरवलं आहे. काय मग समजलं का खरा खिलाडी कोण आहे? यात वादच नाही की कुत्राच खिलाडीयों का खिलाडी ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी कुत्र्याचं कौतुक केलं आहे आणि त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत.The dog won 😅😂 pic.twitter.com/ZmPUKiZzI9
— Nature & Animals🌴 (@AnimalsWorId) March 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Viral, Viral videos