विरार, 27 मार्च: वसई विरार महानगरपालिकेच्या (Vasai Virar Mayor) माजी महापौर आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्नी प्रविणा ठाकूर (Pravina Thakur) यांनी राधा-कृष्ण-मीरा यांचं गायलेलं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 'होरी खेलन पधारो नंदलाला' (Holi 2021) हे गाणं त्यांनी स्वतः लिहिलं आहे आणि गायलं देखील आहे. होळी सणाच्या पूर्वसंधेला हे गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण गायन क्षेत्रात नशीब आजमावताना पाहिलं आहे. आता महापौर प्रविणा ठाकूर याही भजन गायनात रममाण होताना दिसत आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं आलं की त्या नेहमीच ट्रोलर्सच्या रडारवर असतात. नेटिझन्स त्यांच्या गाण्याची नेहम खिल्ली उडवतात. मात्र या कशाचीही पर्वा न करता अमृता फडणवीस यांनी गाणं सुरूच ठेवलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांनी एक गाणं गायलं आहे.
प्रविणा ठाकूर या बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांच्या पत्नी आहेत. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत एकाहाती सत्ता खेचून आणल्यानंतर त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. विशेष म्हणजे 2019 साली भाजपाची लाट असूनही पालघर भागात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vasai virar, Viral