मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मंदिरात पुजाऱ्यासोबत आढळली महिला; नागरिकांनी दोघांना बाहेर काढून केली मारहाण, Video Viral

मंदिरात पुजाऱ्यासोबत आढळली महिला; नागरिकांनी दोघांना बाहेर काढून केली मारहाण, Video Viral

हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

राजस्थान, 4 ऑगस्ट : पुजारीसोबत महिलेच्या कथित अनैतिक संबंधावरून चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या सरनेश्वर महादेव मंदिरातील पुजाऱ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे.  30 जुलै रोजी गंगारार येथील सरनेश्वर महादेव मंदिराच्या ओसरा पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्याचा व्हिडिओ काही लोकांनी अनैतिक संबंधांचा आरोप करत मारहाण केली होती. (woman found with a priest in the temple two were taken out and beaten by civilians Video Viral )

यासोबतच पुजाऱ्याला मारहाण करीत असताना मंदिरात उपस्थित असलेल्या महिलेचा व्हिडिओही बनवण्यात आला. तिला कपडे ओढून मारहाणही करण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुखावलेल्या महिलेने पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रसाद गोयल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात  आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंगळवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर झाली.

हे ही वाचा-7 मुलांच्या आईचं जडलं मुलाच्या मित्रावर प्रेम; लग्नही केलं पण...

" isDesktop="true" id="588179" >

यावेळी पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं की, पुजारी कुटुंब आणि त्याचे कुटुंब यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यांनी पुजारीच्या पत्नीसह मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान पुजाऱ्याची पत्नी तेथे उपस्थित नव्हती. ती त्यांची वाट पाहत होती. दरम्यान, अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांना खोलीत बंद करून मारहाण केली. त्यांनी तिचे कपडे ओढून तिचा अपमान केला. या घटनेचा व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.

या सर्व प्रकारामुळे तिच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. ळी, पीडितेचे म्हणणे आहे की तिचा पती चांगल्या पदावर काम करतो. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. पीडितेने सुमारे 6 ते 7 जणांची नावे घेतली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात पीडितेने सांगितले की जर तिला न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून कारवाईची वाट पाहतील. पीडितेने तिच्या पतीसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली केली.

 

 

First published:

Tags: Rajasthan, Viral video.