मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवलच! समुद्रात पडलेला आयफोन 1 वर्षाने सापडला, बटण दाबताच घडला 'चमत्कार'

ऐकावं ते नवलच! समुद्रात पडलेला आयफोन 1 वर्षाने सापडला, बटण दाबताच घडला 'चमत्कार'

फाईल फोटो

फाईल फोटो

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका महिलेचा आयफोन हा समुद्रात पडला, आणि तिला तो तब्बल 12 महिन्यांनी म्हणजे एका वर्षाने मिळाला. मात्र, त्यानंतरही तो चालू स्थितीत होता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 24 नोव्हेंबर : आयफोन ही आजकाल तुमच्यापैकी बहुतेकांची पसंती असेल. पण आयफोनची किंमत जास्त असल्यामुळे तो प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही. मात्र, या फोनचं आकर्षण अनेकांना असतंच. अ‍ॅपल आयफोन वापरण्याचे स्वप्न बऱ्याच जणांचं असतं. कारण हा फोन सर्वात टिकाऊ मानला जातो. अनेकदा पाण्यात पडल्यानंतरही हा फोन खराब होत नसल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका महिलेचा आयफोन हा समुद्रात पडला, आणि तिला तो तब्बल 12 महिन्यांनी म्हणजे एका वर्षाने मिळाला. मात्र, त्यानंतरही तो चालू स्थितीत होता.

भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर; 55 वर्षानंतर मुलाला Google मुळे लागला शोध

‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. आयफोन हा सर्वांत मजबूत फोन मानला जातो. पाण्यामध्ये पडल्यानंतरही हा फोन खराब होत नाही. अशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या व पाहिल्या असतील की, तासनतास पाण्यात राहूनही आयफोन खराब झाला नाही. पण एका बातमीनं अनेकजण आश्चर्यचकित झालेत. एका महिलेला तिचा समुद्रात पडलेला आयफोन वर्षभरानंतर मिळाला. विशेष म्हणजे हा फोन सुरू होता. ब्रिटनमधील हॅम्पशायर येथील ही घटना आहे. ‘सन यूके’ने याबाबत वृत्त दिलं असून त्यानुसार, हॅम्पशायर येथील रहिवासी क्लेअर एटफिल्ड यांना समुद्रात पडलेला त्यांचा आयफोन 8 प्लस 12 महिन्यांनंतर मिळाला, व तो व्यवस्थित सुरू होता.

जुना फोन पाहिल्यानंतर महिला म्हणाली...

समुद्रात पडलेला आयफोन सापडल्यानंतर क्लेअर एटफिल्ड म्हणाल्या,'जेव्हा आयफोन समुद्रात पडला, तेव्हा तो वॉटरप्रूफ बॅगमध्ये होता. पण आता फोन सापडणार नाही, याची मला खात्री होती. फोन हरवला, असं मी गृहित धरलं होतं. पण हा फोन ब्रॅडली कॉटन यांना सापडला, व त्यांनी मला कॉल करून त्याची माहिती दिली. फोनबद्दल ऐकून मला आश्चर्य वाटलं. हा फोन सुस्थितीत होता, त्याच्या बॉडीवर मात्र काही स्क्रॅच पडले होते.’

शाही पनीर, दाल मखनी, रायतं आणि 9 रोटी, तेही फक्त 26 रुपयांमध्ये! बिल पाहून विश्वास बसणार नाही

असा पडला आयफोन समुद्रात

क्लेअर एटफिल्ड या पॅडलबोर्डर आहेत. पॅडलबोर्डिंग करीत असताना त्यांनी एका वॉटरप्रूफ बॅगमध्ये आयफोन 8 प्लस ठेऊन त्या बॅगची दोरी गळ्यात घातली होती. पण तो समुद्रात पडला. याबाबत त्यांनी सांगितलं की, 'एप्रिल 2021 रोजी मी पॅडलबोर्डिंग करताना फोन गळ्यात घातला होता. मी अनेकदा असं करायचे. पॅडलबोर्डिंग करताना मी बोर्डवरून पडले, आणि तेव्हाच माझा फोन हरवला. मी समुद्रातून बाहेर आले, पण माझा फोन हा समुद्रात पडला होता.’

दरम्यान, संबंधित महिलेचा आयफोन 12 महिन्यानंतर सुस्थितीत सापडला. या घटनेनं आयफोन किती जबरदस्त, मजबूत आणि टिकाऊ आहे, हे सिद्ध झालं आहे. तसंच या निमित्तानं आयफोन वापरणाऱ्यांना ते वापरत असलेला फोन किती मजबूत आहे, यावरील विश्वास वाढण्यासही मदत झाली आहे.

First published:

Tags: Iphone, Viral news