मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर; 55 वर्षानंतर मुलाला Google मुळे लागला शोध

भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर; 55 वर्षानंतर मुलाला Google मुळे लागला शोध

भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर

भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगलकडे आहे, असं म्हणतात. बहुतांश प्रकरणात हे खरं देखील आहे. याची प्रचिती येणारी एक घटना समोर आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर : गुगलकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं असं म्हणतात. गुगलच्या मदतीनं काहीही शोधणं शक्य होतं. तमिळनाडूमधल्या 56 वर्षीय पी. थिरुमरन यांनी तर गुगलच्या मदतीनं 55 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या त्यांच्या वडिलांची कबर शोधली आहे. विशेष म्हणजे ही कबर भारतात नाही, तर मलेशियात होती.

इंटरनेटमुळे दूर जगात चाललेल्या घडामोडींची माहिती घरबसल्या मिळते. गुगल हे सध्याचं प्रभावी अस्त्र आहे. अनेक अडचणींवरचे उपाय, प्रश्नांची उत्तरं आणि अशक्य ते शक्य करणं केवळ गुगलमुळे साध्य होतं. तमिळनाडूतल्या तेनकासीमध्ये राहणाऱ्या पी. थिरुमरन यांना तसा अनुभव आला. ते स्वतः अनाथालय चालवतात. वडिलांची कबर शोधण्यासाठी त्यांनी गुगलची मदत घेतली आणि त्यांना कबर मिळालीही.

थिरुमरन 6 महिन्यांचे असतानाच त्यांचे वडील गेले. मलेशियात 1967 मध्ये थिरुमरन यांचे वडील के. रामासुंदरम उर्फ पुनगुंट्रान यांचा एका आजारानं मृत्यू झाला. त्यांची आई राधाबाईनं वडिलांचा दफनविधी केला आणि थिरुमरन यांना घेऊन भारतात परतली. मात्र वडील मलेशियातील केरलिंगमध्ये केरलिंग थोट्टा थेसिया वकाई तमिल पल्ली या शाळेत शिकत होते, हे थिरुमरन यांना माहीत होतं. गुगलच्या माध्यमातून त्यांनी ही शाळा शोधली. ती इमारत मोडकळीला आल्यामुळे शाळा दुसरीकडे स्थलांतरित झाल्याचं त्यांना कळालं. त्या शाळेचे मुख्याध्यापक कुमार चिदंबरम यांचा ई-मेल थिरुमरन यांना मिळाला. त्यावरून त्यांनी चिदंबरम यांना फोन करून वडिलांची कबर शोधण्याची इच्छा बोलून दाखवली. चिदंबरम यांनीही रामसुंदरम यांच्यासोबतचे बालपणातले विद्यार्थी मोहना राव आणि नागप्पन यांच्याशी संपर्क साधला. त्यांचं वय आता 80 च्या पुढे आहे. मात्र त्यांनी थिरुमरन यांच्या वडिलांची कबर शोधली व त्यांनी त्याची माहिती कळवली.

वाचा - संपूर्ण जग झालं होतं हैराण; या मेंढ्यांच्या विचित्र वागण्याचं रहस्य अखेर उलगडलं

त्यावर “8 नोव्हेंबरला मी मलेशियाला गेलो व झाडाझुडपांत असलेली वडिलांची कबर पाहिली. ती कबर खराब झाली होती. मात्र त्यावर वडिलांचा फोटो, नाव व जन्म-मृत्यूची तारीख लिहिली होती,” असं थिरुमरन यांनी सांगितलं. भारतात 16 नोव्हेंबरला परतण्याआधी त्या कबरीजवळ बसून अनेक वेळा प्रार्थना केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

थिरुमरन यांनी आतापर्यंत 60 अनाथ मुलांची लग्न करण्यासाठी व 100 पेक्षा अधिक मुलांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त्याशिवाय 3,009 रक्तदान शिबिरं आयोजित केली आहेत. स्वतः अनाथ असल्यामुळे अनाथ मुलांचं दुःख काय असतं, याची त्यांना जाणीव आहे. तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील वेकडमपट्टी गावात ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आई त्यांना भारतात घेऊन आली. मात्र 35 वर्षांपूर्वी आईचाही मृत्यू झाला. त्याआधीपासूनच थिरुमरन यांना वडिलांची कबर शोधायची होती. अखेर गुगलच्या मदतीनं त्यांनी ती शोधली.

First published:

Tags: Google, Viral news