जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हे आहे जगातलं सर्वांत श्रीमंत गाव, गावातल्या प्रत्येकाचं वार्षिक उत्पन्न ऐकून व्हाल चकित

हे आहे जगातलं सर्वांत श्रीमंत गाव, गावातल्या प्रत्येकाचं वार्षिक उत्पन्न ऐकून व्हाल चकित

Representative image

Representative image

या गावासमोर मोठी शहरंही फिकी वाटू लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांचं वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्ही चकित व्हाल.

जियांगयिन, 03 जून: लोकांना गावाचं (Village) वर्णन करा, असं म्हटलं की कच्ची घरं, झोपड्या, कच्चा रस्ता, शेत अशा गोष्टी त्यांच्या मनात येतात; पण सगळीच गावं तशी नसतात. कारण आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबद्दल सांगणार आहोत त्या गावाने भारतातील मेट्रो शहरांनाही (Metro Cities) मागे टाकलंय. या गावासमोर मोठी शहरंही फिकी वाटू लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांचं वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्ही चकित व्हाल. होय, या गावात राहणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 80 लाख रुपयांहून जास्त आहे. आता तुम्हाला वाटेल की आम्ही मस्करी करतोय, पण तसं नाहीये. गावकरी आहेत शहरी लोकांपेक्षाही श्रीमंत आम्ही ज्या गावाबद्दल बोलत आहोत त्याला जगातील सर्वांत श्रीमंत गाव (Richest Village of the World) म्हटलं जातं. हे कृषीप्रधान गाव आहे, म्हणजेच येथील लोक प्रामुख्याने शेती करतात. असं असूनही त्यांची घरं (Houses), त्यांची लाइफस्टाइल (Lifestyle) पाहिली तर अगदी मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांनाही हेवा वाटेल, अशी आहे. या गावाचं नाव हुआझी आहे आणि ते चीनमधील (China) जियांगयिन शहराजवळ वसलंय. या गावात राहणारा प्रत्येकजण शहरांमध्ये राहणाऱ्यांपेक्षाही जास्त श्रीमंत आहे. गावात सगळेच करतात शेती हुआझी गाव हे कृषीप्रधान गाव आहे. म्हणजेच इथं राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती (Farming) आहे; पण गावातील शेतकऱ्यांनी अंगीकारलेल्या एका आयडियामुळे हे गाव जगातलं श्रीमंत गाव झालंय. या गावात राहणारा प्रत्येक माणूस पक्क्या आलिशान घरात आरामात राहतो. त्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत. गावात पक्के रस्ते आणि ड्रेनेजची योग्य व्यवस्था आहे. गाव कसं झालं श्रीमंत? हे गाव वसलं तेव्हा आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. हे गाव 1961 मध्ये वसलं. तेव्हा हे गाव खूप गरीब होतं आणि इथल्या शेतीची अवस्था फार वाईट होती. मात्र त्यानंतर गावात कम्युनिस्ट पक्षाच्या एका संघटनेची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष वू रेनवाओ यांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. इथं प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीवर शेती करण्याऐवजी गटात शेती (Group Farming) करू लागला. सामूहिक शेतीमुळे या गावातील लोकांचं भविष्य बदललं. परिणामी, आज या गावातली प्रत्येक व्यक्ती लखपती आहे. ED नं राहुल गांधींना दिली नवीन तारीख, आता चौकशीसाठी बोलावलं ‘या’ तारखेला गावातील गटशेतीची कल्पना यशस्वी झाल्याने इथला प्रत्येक शेतकरी आता वर्षाला 80 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवतोय. प्रत्येकाकडे मोठमोठी घरं आणि स्वतःच्या गाड्या आहेत. फक्त एका कल्पनेनं एकेकाळी गरीब असलेल्या या गावाला जगातलं सर्वात श्रीमंत गाव बनवलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: china
  • First Published :
जाहिरात
जाहिरात