Home /News /maharashtra /

पुण्यात राहणाऱ्या टोळीने कर्जतमध्ये धावत्या रेल्वेत टाकला दरोडा, लुटमार सुरू केली पण....

पुण्यात राहणाऱ्या टोळीने कर्जतमध्ये धावत्या रेल्वेत टाकला दरोडा, लुटमार सुरू केली पण....

सतर्क प्रवाशांमुळे या टोळीचा डाव उधळला गेला. धक्कादायक म्हणजे, यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

सतर्क प्रवाशांमुळे या टोळीचा डाव उधळला गेला. धक्कादायक म्हणजे, यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

सतर्क प्रवाशांमुळे या टोळीचा डाव उधळला गेला. धक्कादायक म्हणजे, यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

कल्याण, 30 जानेवारी :  लांबपल्ल्याच्या मेल एक्स्प्रेसमध्ये (  Express train) लूटपाट करणाऱ्या टोळीला कल्याण जीआरपी पोलिसांनी (kalyan grp police) अटक केली आहे. पुण्यात राहणाऱ्या या टोळीने कर्जतमध्ये धावत्या रेल्वेत घुसून लुटमार सुरू केली होती. पण, सतर्क प्रवाशांमुळे या टोळीचा डाव उधळला गेला. धक्कादायक म्हणजे, यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटत असताना काही प्रवाशांनी सतर्कता दाखवत 100 नंबरवर फोन करत याची माहिती दिली. त्यानंतर कल्याण जीआरपी आणि आरपीएफला मिळाली. त्यानुसार, ड्युटीवर असलेले आरपीएफ जवानाने त्वरीत  सापळा रचत लुटरूच्या पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख अशी अटक करण्यात आलेल्या लुटारुंची नावे आहेत. या लुटारुंच्या टोळीत एक चौदा वर्षाचा अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. वसई येथे राहणाऱ्या जया पिसे ही महिला प्रवासी तिच्या मुलीसोबत काकीनाडा भावनगर एक्स्प्रेसमधून ( Kakinada Bhavnagar Express train) प्रवास करीत होत्या.  त्या सोलापूर येथून गाडीत बसल्या होत्या. २७ जानेवारी रोजी गाडी कजर्त स्थानकाजवळ आली असता बोगीत काही प्रवाशांनी चोर चोर असा आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांचा आवाज ऐकून जया यांनी त्यांची बॅग आपल्याजवळ घेऊन बसल्या. याच दरम्यान चार ते पाच जण तिच्याजवळ आले. वस्तूने भरलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जयाने त्यांना प्रतिकार केला. एकाने चाकूचा धाक दाखवीत तिच्याकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एक सतर्क नागरिकाने 100 नंबरवरुन पोलिसांना फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेले आरपीएफ जवानाने त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपी पोलिसांच्या हवाली केले. हे पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा या परिसरात राहणारे आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती कल्याण जीआरपीच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: कल्याण

पुढील बातम्या