मुंबई, 25 फेब्रुवारी : सामान्यपणे आपण अन्न शिजवण्यासाठी अॅल्युमिनियम, स्टिल, नॉनस्टिक अशा भांड्यांचा वापर करतो. मातीच्या भांड्यांतही पदार्थ शिजवले जातात. पण कधी प्लॅस्टिकच्या पिशवीत तुम्ही पदार्थ शिजवल्याचं पाहिलं आहे. आता तसे ओव्हनमध्ये पदार्थ गरम करता येतील अशी प्लॅस्टिकची भांडी आहेत. पण ही भांडी आगीवर आपण ठेवू शकत नाही. असं असताना चक्क ज्या पिशवीतून आपण भाजी आणतो, अशा प्लॅस्टिक पिशवीत एका आजीबाईने जेवण शिजवलं आहे. जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
प्लॅस्टिकच्या पिशवीत पदार्थ शिजवणाऱ्या या आजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका महिलेने काही लाकडं पेटवली आहेत. त्यानंतर ती एका काठीवर प्लॅस्टिक पिशवी लावते. त्यात पाणी भरलेलं आहे. ही पिशवी ती त्या आगीच्या वर ठेवते. आता प्लॅस्टिक पिशवी आगीच्या संपर्कात आल्यावर काय होईल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण इथं मात्र उलटंच घडतं जे पाहून सर्वांना धक्का बसला आहे. Shocking! चिकन खाताच व्यक्तीला मारला लकवा; सुदैवाने मरता मरता वाचला
महिला त्या पिशवीतील पाण्यात वेगवेगळे मसाले टाकते आणि त्यानंतर एक मासा टाकून शिजवायला ठेवतो. आता हा पदार्थ शिजला की नाही ते माहिती नाही. पण महिलेची शिजवण्याची टेक्निक पाहून मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आगीच्या संपर्कात आल्यानंतरही प्लॅस्टिकची पिशवी फुटली नाही किंवा विरघळली नाही.
@TheFigen_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एक एलिमेंट्री फिजिक्स असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. आश्चर्य! 24 वर्षे फक्त एका फळावर जगतेय ही व्यक्ती; आजारातूनही ठणठणीत झाल्याचा दावा यावर बऱ्याच कमेंट येत आहे. ही पिशवी विरघळली का नाही?, हे कोणतं प्लॅस्टिक आहे?, असा प्रश्न युझर्सना पडला आहे.
An elementary physics.pic.twitter.com/aqDuNa0Y5G
— Figen (@TheFigen_) February 23, 2023
तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल किंवा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.