जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : तुम्हीही असे कपडे घालून जिममध्ये जात असाल तर सावधान; महिलेसोबत घडला भयावह प्रकार

Viral News : तुम्हीही असे कपडे घालून जिममध्ये जात असाल तर सावधान; महिलेसोबत घडला भयावह प्रकार

जिममध्ये महिलेसोबत घडला भयावह प्रकार

जिममध्ये महिलेसोबत घडला भयावह प्रकार

जिममध्ये सैल कपडे घालण्याचे काय परिणाम होतात हे तिने लोकांना दाखवलं. असा अपघात तिच्यासोबत घडला ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकत होता

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जून : आजच्या काळात जगातील प्रत्येक व्यक्ती फिटनेसबाबत जागरूक झाला आहे. लोकांच्या लक्षात आलं आहे की त्यांच्या आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. प्रकृती ठीक असेल तरच जवळ येणाऱ्या पैशाचाही उपयोग होईल. आता तर अनेक महिलाही जिममध्ये घाम गाळताना दिसतात. पण अनेक महिला सैल कपडे घालून जिममध्ये जातात. या महिला त्यांच्या फिगरबाबत खूप कॉन्शियस असतात. यामुळे त्या सैल कपडे घालून जिममध्ये जातात. पण हे घातक ठरू शकतं. सोशल मीडियावर अलिसा कोंकेल नावाच्या महिलेनं लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. जिममध्ये सैल कपडे घालण्याचे काय परिणाम होतात हे तिने लोकांना दाखवलं. असा अपघात तिच्यासोबत घडला ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकत होता. परंतु, सुदैवाने तसं झालं नाही आणि महिला फक्त जखमी झाली. अलिसा सैल योगा पँट घालून जिममध्ये पोहोचली होती. यादरम्यान ती ट्रेडमिलवर धावत असताना तिची पँट मशीनमध्ये अडकली आणि ती खाली पडली. Shocking News : महिलेला घरात अचानक दिसला रहस्यमयी दरवाजा; उघडून पाहिल्यावर जे दिसलं ते… अमेरिकेतील अलिसाने सांगितलं की, ही घटना तिच्यासाठी खूप लाजिरवाणी होती. जिममध्ये लोक भरपूर होते आणि ती सर्वांसमोर खाली पडली. आता तिला आयुष्यभर ट्रेडमिलवर चढण्याची भीती वाटेल. तिने सांगितलं की ती सैल योगा पँट घालून ट्रेडमिलवर धावत होती. त्यानंतर तिची पँट मशीनमध्ये अडकली. तिची पँट खाली घसरली आणि ती अर्धनग्न झाली. या घटनेनंतर ती लगेच उठली आणि जिममधून निघून गेली.

ट्रेडमिलवर धावत असताना तिची पँट मशीनमध्ये अडकली आणि ती खाली पडली

घटना 24 मेची आहे. हा संपूर्ण प्रकार जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये अलिसा अगदी सामान्य पद्धतीने ट्रेडमिलवर चढताना दिसत आहे. पण हळूहळू तिची पँट खाली येत राहिली. यानंतर अचानक पँट मशीनमध्ये अडकली आणि निघून गेली. तिची पँट उतरताना सगळ्यांनी पाहिलं. एका व्यक्तीने येऊन मशीन बंद केली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. नंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं की, ट्रेडमिलवर धावत असताना अलिसाच्या बुटांची लेसही उघडी होती. त्यामुळेच हा अपघात प्रत्यक्षात घडला. यासोबत तिच्या पँटमुळेही घटनेनं आणखीच भयानक रूप घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात