नवी दिल्ली: कल्पना करा की बरीच वर्षे तुम्ही एका घरात राहताय, पण तुमच्या त्याच घरात एक छुपा दरवाजा आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहितीच नाही. अचानक एकेदिवशी तुम्हाला तो दरवाजा दिसतो, त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? निश्चितच तुम्ही घाबरून जाल. असाच काहीसा प्रकार एका महिलेबरोबर घडला. ही महिला घराच्या भिंतीवर वॉलपेपर लावत होती, त्यावेळी तिला तिच्या घरात एक दरवाजा दिसला, जो आधी नव्हता. तिने तिचा अनुभव ‘रेडिट’वर शेअर केलाय. ती भिंतीवर वॉलपेपर लावत होती, पण आधीच्या वॉलपेपरच्या मागे एक दरवाजा होता. त्याच्या आत काय असेल, याबद्दल तिला कल्पनाच नव्हती. तिला वाटलं की हा बंद असल्याने तिथे कोळी आणि जाळी असतील, पण तसं नव्हतं. त्या ठिकाणी तिने जे पाहिलं, त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. ‘मिरर यूके’च्या रिपोर्टनुसार, महिला ते बघून खूप घाबरली. तिने पोस्टमध्ये म्हटलंय की, “मी त्या कोपऱ्यात एक मानवी सांगाडा पाहिला. मी खोटं बोलत नाहीये. ते पाहून मी खूप घाबरले. पण नंतर तो सांगाडा बनावट असल्याचं मला कळलं. घराच्या जुन्या मालकाने तो इथेच ठेवला होता.”
दरम्यान, महिलेने शेअर केलेल्या अनुभवावर नेटकरी खूप कमेंट्स करत आहेत. तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीची कल्पना करायची आहे, जो बऱ्याचदा त्या सांगाड्याची आठवण काढतो, ज्याला त्याने या खोलीत लपवून ठेवलं होतं आणि विचार करत असेल की त्याला कोणी पाहिलं असेल का?’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. आणखी एका युजरने म्हटलं की, ‘घर विकण्यापूर्वी तुम्ही पुन्हा ती खोली बंद करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही ही परंपरा पुढे नेऊ शकाल.’
Skeleton in secret room : महिलेला घरात सापडला सिक्रेट दरवाजा; उघडताच निघाली किंकाळीतिसऱ्या युजरने लिहिलं, ‘बेडरूममध्ये बेसबोर्डच्या मागे एक चिट्ठी लिहून ठेवाल. खरोखर एखाद्याच्या खजिन्याचा शोध एका चिट्ठीवर येऊन थांबेल आणि शेवटी ती फक्त एक मस्करी असेल. पुढच्या व्यक्तीला चिट्ठी आणि खोली शोधण्यात किती मजा येईल याचा विचार करा.’ यावर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. ‘ठीक आहे, तुम्ही कमीत कमी या गोष्टीमुळे आनंदी होऊ शकता की घराचा जुना मालक खूप भयावह विनोद करणारा होता आणि तुमच्या घरात कोणताच आत्मा नाही,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

)







