रवी सपाटे/गोंदिया, 26 ऑक्टोबर : चालत्या गाडीत चढू नये, उतरू नये, असं वारंवार सांगितलं जात असतानाही कित्येक लोक तेच करतात आणि मृत्यूच्या दारात जातात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. गोंदियातील ही घटना आहे. एक महिला चालत्या रेल्वेतून उतरत होती, त्यानंतर जे घडलं ते पाहूनच धडकी भरेल. या महिलेसोबत पुढे काय झालं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा. साकवांतीबाई बाईसार असं या महिलेचं नाव आहे. ती कटंही बालाघाटमध्ये राहणारी आहे. गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांवर चारवर ती रायपूर एक्स्प्रेसमधून उतरत होती. त्यावेळी तिच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली. गोंदियातील रेल्वे स्टेशनवरील ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे वाचा - VIDEO - ट्रेनचा हॉर्न वाजत होता, लोक ओरडत होते; तरी रेल्वेसमोर आपल्याच धुंदीत चालत राहिली महिला आणि… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक्स्प्रेस ट्रेन आहे. ती चालताना दिसते आहे. त्याचवेळी एक महिला त्या ट्रेनमधून उतरते. गाडी सुरू असल्याने तिचा तोल जातो. ती खाली कोसळते आणि गाडीखाली जाणार तो… सुदैवाने तिथंच रेल्वे सुरक्षा जवान आपलं कर्तव्य बजावत होते. ते तात्काळ तिच्या मदतीसाठी धावून आले. इतर प्रवाशांनीही तिला वाचवण्यासाठी धडपड केली.
चालत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा अपघात; गोंदिया रेल्वे स्टेशनवरील दुर्घटना. pic.twitter.com/sQS6ySTQG4
— News18Lokmat (@News18lokmat) October 26, 2022
महिलेला सर्वांनी पकडलं आणि ओढलं. तिला मृत्यूच्या दारातूनच त्यांनी खेचून काढलं आहे. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे.