मुंबई, 25 ऑक्टोबर : रेल्वे किंवा ट्रेन दुर्घटना, अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी धावत्या ट्रेनमध्ये चढताना तर उतरताना कोसळतं, कुणी रेल्वे रूळ क्रॉस करताना अचानक ट्रेन येते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक महिला रेल्वे ट्रॅकवर आपल्याच धुंदीत चालत होती. त्यावेळी अचानक ट्रेन आली आणि पुढे जे घडलं ते पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. अक्षरशः अंगावर काटा आणेल असा हा व्हिडीओ आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडू नये, असं वारंवार सांगितलं जातं. पण तरी काही लोक वेळ वाचवण्यासाठी, शॉर्टकट म्हणून रेल्वे रूळ ओलांडतात. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एक महिला रेल्वे रूळ ओलांडत आहे. पण त्यावेळी ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनकडे मात्र तिचं बिलकुल लक्ष नव्हतं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ट्रेन येताना दिसते आहे. तिथं बरेच लोक आहेत म्हणून ट्रेन हॉर्न वाजवतच येते. ट्रेनचा हॉर्न ऐकून काही लोक थांबतात. पण एक महिला मात्र रेल्वे ट्रॅकवरून चालतच राहते. तिच्यापासून काही अंतरावरच ट्रेन आहे. तिला पाहून मोटरमन हॉर्न वाजवत राहतो पण तरी महिलेचं काही तिकडे लक्ष जात नाही. हे वाचा - बापरे! हात लावताच बॉम्बसारखा Mobile blast, तोंडावरच उडाली आग; Shocking Video ट्रेन महिलेच्या इतकी जवळ असते की एमर्जन्सीमध्ये ब्रेक मारला तरी महिला जिथं आहे, त्याच्याआधी लगेच ट्रेन थांबू शकत नाही. त्यामुळे मोटरमनही हॉर्न वाजवण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. तिथं असलेले लोकही मोठमोठ्याने ओरडून त्या महिलेला बाजूला व्हायला सांगत होते. पण ती आपल्याच विचारात मग्न असल्याचं दिसतं. जशी ट्रेन तिच्या जवळ येतं, तसा आपल्या हृदयाचा ठोकाही चुकतो. आता महिला ट्रेनखाली चिरडते की काय अशी भीती वाटू लागते. आपल्या हृदयाची धडधड वाढते. सुदैवाने ट्रेन महिलेला धडकणार तोच ती भानावर येते आणि ट्रेनला आपल्या जवळ पाहून तिला धक्काच बसतो. ती धावू लागते आणि ट्रेन तिला उडवण्याआधी ती रेल्वे ट्रॅक क्रॉस करून पलिकडे जाते. हुश्श! तेव्हा कुठे आपल्याही जीवात जीव येतो. हे वाचा - बापरे! ठाण्यात अशी दिवाळी पाहून पोलीसही हादरले; VIDEO तल्या तरुणाचा शोध सुरू हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा ते माहिती नाही. @sakhtlogg इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.