Home /News /viral /

भुकेल्या मगरींना खायला द्यायला गेली आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

भुकेल्या मगरींना खायला द्यायला गेली आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मगरीने बाहेर उडी मारली आणि...

मगरीने बाहेर उडी मारली आणि...

भुकेली मगर चिकनचे मांस नाही तर माणसांचं मांस खाण्याच्या तयारीत होती.

    कॅलिफोर्निया, 13 ऑगस्ट : नॅशनल पार्कमध्ये आपण मगरींना (Crocodiles) लांबून पाहिलं तरी धडकी भरते. मगरींच्या हल्ल्याचे (Crocodile Attack) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Crocodiles video) व्हायरल होत असतात. मगर अगदी हुशारीने एका फटक्यात कशी शिकार करते हे आपल्याला माहितीच आहेत. त्यात त्या मगरी भुकेल्या असतील आणि आपण त्यांच्यासमोर गेलो तर मग काही खरं नाही. पण एका महिलेने तसा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून धडकीच भरेल (Crocodile atttack onwoman) . भुकेल्या मगरींना खायला देणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कॅलिफोर्नियातील (California) द रेप्टाइल झूमधील (The Reptile Zoo) हा शॉकिंग व्हिडीओ आहे. ज्यामध्ये भुकेल्या मगरींना खायला देणाऱ्या महिलेवर मगरीने हल्ला केला आहे. या प्राणीसंग्रहायात या मगरींना तीन वेळा मांस खायला दिलं जातं. ही महिला जिचं नाव ज्युलिएट  (Juliet) आहे ती या मगरींना नेहमी मांस खाऊ घालते. यावेळीही ती त्यांना खायला द्यायला गेली. एका काचेमध्ये या मगरी बंदिस्त असतात. खायला देण्यासाठी तिने काचेच्या बॉक्सचा दरवाजा उघडला आणि त्यातील दोन मगरी तिथं धावत आल्या. काचेतून त्या डोकावू लागल्या. महिलेने आपल्या हातातील एका काठीत चिकनचं मांस धरून त्या मगरींच्या तोंडाच्या दिशेने नेलं. एका मगरीने ते मांस तोंडात धरत बाहेरच उडी घेतली. हे वाचा - जो साप वाटला तो तर...; बेडरूममध्ये 'ते' पाहून महिलेला वाटली लाज मगर जणू त्या महिलेवर हल्ला करण्याच्या तयारीत होती. पण महिलेच्या धाडसालाही मानायला हवं. जरी ती हसताना दिसत असली तरी मगरीला असं काही करताना पाहून तिला धडकीच भरली. तीसुद्धा घाबरली. तरी तिने दोन्ही मगरींना खायला घातलं आणि नंतर बाहेर पडलेल्या मगरीला पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी मदतीला एका व्यक्तीला बोलावलं. त्यानंतर दोघांनी मिळून कसंबसं त्या मगरीला आत सोडलं. जवळपास साडे आठ फूट लांब ही मगर आहे. तिला डार्थ गॅटर असं म्हटलं जातं. हे वाचा - माणसाने घेतला बदला; मरेपर्यंत चावत राहिला, घरी येऊन पत्नीसमोर ठेवला मृत कोब्रा झूच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या