मराठी बातम्या /बातम्या /Viral /Man Bites Snake: माणसाने घेतला बदला; मरेपर्यंत चावत राहिला, घरी येऊन पत्नीसमोर ठेवला मृत विषारी क्रोबा

Man Bites Snake: माणसाने घेतला बदला; मरेपर्यंत चावत राहिला, घरी येऊन पत्नीसमोर ठेवला मृत विषारी क्रोबा

विशेष म्हणजे सापाला चावल्यानंतरही व्यक्ती ठणठणीत आहे. त्याला काहीच त्रास झाला नाही.

विशेष म्हणजे सापाला चावल्यानंतरही व्यक्ती ठणठणीत आहे. त्याला काहीच त्रास झाला नाही.

विशेष म्हणजे सापाला चावल्यानंतरही व्यक्ती ठणठणीत आहे. त्याला काहीच त्रास झाला नाही.

जाजपुर, 13 ऑगस्ट : तसं पाहता नाग-नागिणीने सूड उगवल्याच्या कहाण्या अनेक ऐकल्या असतील. मात्र कधी कोणा व्यक्तीने सापाचा सूड उगविल्याचं ऐकलं आहे का? ओडिसामध्ये (Odisha News) एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका 45 वर्षीय व्यक्तीने विषारी सापाची चावून चावून त्याची हत्या केली. (Man Bites Snake took revenge kept biting snake till death)

शेतातून परतताना पायाला विषारी सापाने चावलं

ओडिशामधील जाजपुर जिल्ह्यातील एका गावातील आदिवासी व्यक्तीला कोब्राने चावलं. मात्र त्यानंतर व्यक्तीने सापाला हातात पकडून त्याला चावून चावून मारून टाकलं. हा शेतकरी शेतातून काम करून घरी परतत होता. खूप रात्र झाली होती. या दरम्यान एका सापाने त्याच्या पायाला चावा घेतला. बद्राने विषारी सापाला हातात पकडलं आणि तो मरत नाही तोपर्यंत दाताने चावत राहिला.  

हातात सापाला पकडलं आणि दाराने चावत राहिला

बद्राने घटनेबद्दल म्हणाला की, बुधावारी रात्री जेव्हा मी घरी परतत होतो, तेव्हा सापाने माझ्या पायाला चावलं. मी टॉर्चने पाहिलं तर तेथे साप होतो. सूड उगविण्यासाठी मी सापाला हातात पकडलं आणि वारंवार आपल्या दाताने चावलं. त्यानंतर सापाचा तेथेच मृत्यू झाला.

हे ही वाचा-फक्त नागपंचमीला उघडतात ‘या’ मंदिराचे दरवाजे; वर्षातून एकच दिवस मिळतं दर्शन

मृत साप घेऊन पोहोचला घरी

या घटनेनंतर मृत साप घेऊन आपल्या गावा परतला आणि पत्नीला सर्व घटना सांगितली. लवकरच गावभरात याची चर्चा सुरू झाली. बद्राने आपल्या मित्रांनाही मृत साप दाखवला. काही लोकांनी बद्राला जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने रुग्णालयात जाण्यापासून नकार दिला. त्याऐवजी तो पारंपरिक उपचार देणाऱ्या व्यक्तीकडे गेला.

सापाला चावलं तरी काहीच झाला नाही परिणाम

सुदैवाने बद्राने सापाला चावलं तरी काहीच परिणाम झाला नाही. करेत नावाचा साप हा अत्यंत विषारीमध्ये येतो. हा साप कोब्रापेक्षा जास्त विषारी असतो. या घटनेनंतर बद्राने सांगितलं की, मी विषारी सापाला चावलं होतं, मात्र मला काहीच त्रास झाला नाही. मी गावातील पारंपरिक वैद्याकडे गेलो व तेथून उपचार केले.

First published:

Tags: Crime, Odisha, Snake, Snake in bike