Home /News /viral /

तिला होती शेळीबरोबर सेल्फी घेण्याची हौस, शेळीने रागात येत केलं असं काही की व्हायरल झाला VIDEO

तिला होती शेळीबरोबर सेल्फी घेण्याची हौस, शेळीने रागात येत केलं असं काही की व्हायरल झाला VIDEO

प्राण्यांनाही भावना असतात हे लक्षात ठेवूनच माणसानं वागावं.

  मुंबई, 13 मार्च : सेल्फी घ्यायला कुणाला आवडत नाही? अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकानं एकदातरी सेल्फी ट्राय केलेलाच असतो. अनेकजण तर सेल्फीसाठी क्रेझी असतात. (viral video) तरुण आणि टिनएजर्स तर बघितलं तिथं सेल्फी घेऊ लागतात. अनेकदा सेल्फी घेण्याच्या नादात कित्येकांनी जीव गमावलेला आहे. तरीही स्टंट करून सेल्फी घेणं लोक सोडत नाहीत. (woman selfie viral video) आता असाच एक अजब सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. असं आहे तरी काय का सेल्फीमध्ये? यात एक महिला सेल्फी घेताना दिसते. मात्र यादरम्यान त्या महिलेसोबत जे झालं ते बघून तुम्हीही हैराण व्हाल. (woman takes selfie with goat viral video) सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सेल्फीमध्ये एक महिला जंगलात सेल्फी घेताना दिसते आहे. काही अंतरावर एक शेळी दोरीनं बांधलेली आहे. महिला या शेळीला पाहून तऱ्हेतऱ्हेच्या एक्स्प्रेशन्स देते आहे. हेही वाचा VIDEO:खोकणं, शिवीगाळ, गैरवर्तन..कॅब ड्रायव्हरनं मास्क घाला सांगताच महिलांचा राडा सोबतच सेल्फीही घेते आहे. दोरीनं बांधलेली शेळीही महिलेला पाहते आहे. मागे पुढे जाते आहे. (goat attacked woman taking selfie)
  मात्र एका क्षणी शेळी अचानकच महिलेच्या मागे येते. आणि वेगात तिला शिंग मारते. इतक्यात महिलेचा मोबाईलही पडतो. अचानक झालेल्या हल्ल्यानं महिला भांबावून गेली आहे. हेही वाचा भरसमुद्रात बोटीवर धगधगत होत्या आगीच्या ज्वाला; पाहा थरारक VIDEO व्हिडिओ पाहून तरी हेच वाटतं आहे, की महिलेच्या या वागण्यानं शेळीला राग आला आणि तिनं या महिलेवर अटॅक केला. हा व्हिडिओ wildlife capture नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. आता हा व्हिडिओ खूप वेगानं व्हायरल होतो आहे. जवळपास 3 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram, Selfiy video, Viral video., Wild life

  पुढील बातम्या