नवी दिल्ली, 12 मार्च : कोरोना व्हायरसचा धोका अद्यापही कायम आहे. यावर मास्क घालणं हे सुरक्षेचा उपाय आहे. परंतु अनेक लोक मास्क न घालताच फिरताना दिसतात. अशात जर कोणी मास्क घाला, असा सल्ला दिला तर त्यालाच उलट उत्तर दिलं जातं. असचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिला प्रवाशाने आपल्या मित्रांसह मिळून, मास्क लावा असं सांगणाऱ्या कॅब ड्रायव्हरसह गैरवर्तन केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये, कॅबमध्ये मागच्या सीटवर तीन महिला बसल्या आहेत. एका महिलेने मास्क लावलं आहे आणि ती तिच्या फोनमध्ये व्यस्त असल्याचं दिसतंय. तर दोन महिला कॅब ड्रायव्हरसह भांडण करताना दिसतात. कॅब ड्रायव्हरने त्या दोघींना मास्क लावा असं सांगितल्यानंतर त्यापैकी एका महिला राग आला आणि तिने कॅब चालकाशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. ती ड्रायव्हरजवळ जावून खोकते, त्याला अपशब्द, शिवीगाळ करते तसंच ड्रायव्हरचा फोनही खेचून घेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केलं जात आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'एबीसी 7' चे रिपोर्टर डायोन लिम यांनी शेअर केला आहे.
कॅब ड्रायव्हर शुभांकरने महिलांना कॅबमध्ये मास्क लावण्यास सांगितल्यानंतर महिलांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर शुभांकरने गाडी थांबवून त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितलं. परंतु त्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला. महिला कॅब ड्रायव्हरला ओरडू लागल्या, त्यांनी त्याचं मास्कही खेचून काढल्याचं व्हिडीओत दिसतंय.
View this post on Instagram
हा संपूर्ण प्रकार सॅन फ्रॅन्सिस्कोमधील आहे. सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांनी या प्रकरणी ते चौकशी करत असल्याचं सांगितलं असून लवकरच त्या महिलांविरोधात कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Viral videos