आंतरराष्ट्रीय समुद्राच्या सीमेवर मासेमारी करणाऱ्या बोटीला अचानक आग लागल्याचं वृत्त आहे. यावेळी कोस्टगार्डने 7 मासेमाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं. बोटीला लागलेली आग विझवतानाचा एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कोस्टगार्डचे जवान दुसऱ्या बाजूला उभं राहून पाण्यात आग लागलेल्या बोटीला विझवताना दिसत आहेत. (The boat caught fire at sea 7 fishers life saved)
हरसिद्धी नावाच्या या मासेमारी बोटीच्या इंजिन खोलीत आग लागल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यावेळी बोटीत 7 जणं प्रवास करीत होते. यावेळी मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या एका बोटीने कोस्टगार्डला याबाबत माहिती दिली आणि बोटीतून प्रवास करणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला.
आंतरराष्ट्रीय समुद्राच्या सीमेवर मासेमारी करणाऱ्या हरसिद्धी नावाच्या बोटीला अचानक आग लागली. यावेळी कोस्टगार्डने 7 मासेमाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं. pic.twitter.com/Nv5324ckq2
— News18Lokmat (@News18lokmat) March 12, 2021
हे ही वाचा-VIDEO - 12व्या मजल्यावरून कोसळली चिमुकली; सुपरहिरोसारखं डिलीव्हरी बॉयनं केलं कॅच
कोस्टगार्डला याबाबत माहिती मिळताच आयसीजीएस राजरतन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. कमीत कमी वेळात घटनास्थळी पोहोचून मासेमारी करणाऱ्यांना वाचविण्यात आलं आणि बोटीला लागलेली आग विझविण्यात आली. (The boat caught fire at sea 7 fishers life saved) आज दुपारी 3 वाजता सर्व मासेमाऱ्यांना पोरबंदर येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे.
कोस्टगार्डचे कर्मचारी समुद्रात बोट विझवतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रात बोटीतून आगीच्या ज्वाला निघत आहे. पाण्यात आग पेटत असल्याचं हे दृश्य पाहून अनेक भांबावून गेले. बऱ्याच वेळ सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर अखेर बोटीवरील आग नियंत्रणात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, India, Viral video.