दिल्ली, 10 जानेवारी : तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, नवरा-बायको किंवा मित्रमैत्रिणी, प्रिय व्यक्तीसह डेटवर गेला असाल. अगदी प्राणीप्रेमी म्हणून तुम्ही श्वान, मांजर अशा प्राण्यांनाही तुमच्यासोबत फिरायला नेलं असेल. पण एक तरुणी चक्क अजगरा सोबत डेटिंगवर गेली. दोघंही हॉटेलमध्ये गेले. त्यांचा तिथला व्हिडीओ ही सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे. साधा छोटासा साप जरी दिसला तरी आपल्याला घाम फुटतो. अशात अवाढव्य अजगर आपल्यासमोर आला तर काय होईल? विचारही नकोसा वाटतो. पण काही लोक असे आहेत जे अजगरांना पाळतात. अजगरांसोबत मैत्री करणाऱ्या अशा बऱ्याच लोकांचे व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण ही तरुणी तर त्याच्याही पुढे गेली. ती चक्क अजगरासोबत हॉटेलमध्ये दिसली. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता तरुणी अजगरासोबत एका हॉटेलमध्ये दिसते आहे. तरुणी खुर्चीवर बसली आहे आणि अजगर तिच्यासमोर डायनिंग टेबलवर आहे. तरुणीच्या शेजारी दुसरी तरुणीही बसली आहे. डायनिंग टेबलवर काही पदार्थही आहेत. सुरुवातीला अजगर शांत बसला आहे. पण काही वेळाने तो आपलं तोंड त्या तरुणीच्या दिशेने नेतो. तेव्हा तरुणी आपल्या ताटातील पदार्थ चमच्यात घेऊन त्या अजगराच्या तोंडाजवळ नेते. जणू काही तिने अजगराला भरवलं आणि अजगराने ते खाल्लं. हे वाचा - माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल त्यानंतर अजगर आपलं डोकं दुसऱ्या दिशेला वळवतो आणि तरुणी स्वतः खाऊ लागते. तिच्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं.
पण हा अजगर खरा आहे का? खरंच ही तरुणी अजगरासोबत जेवण करते आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. काही जणांना हे खरं वाटत आहे. पण काही जणांनी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - डोळ्याची पापणी लवण्याआधी अजगराने अख्खं हरिण गिळलं; शिकारीचा थरारक LIVE VIDEO तुम्ही जर व्हिडीओ नीट पाहिला तर जेव्हा कॅमेरा खाली होता तेव्हा अजगराकडे नीट पाहा. तो टेबलवर नाही तर ताटाच्या वर आहे. म्हणजे तो अगदी हवेतच आहे. तसंच तुम्ही कलरही पाहिला तर अजगर एकदम परफेक्ट दिसतो आहे तर तरुणी आणि ती जिथं आहे, त्या दृश्याची क्वालिटी थोडी कमी वाटते आहे. एकंदर हा व्हिडीओ अॅनिमिटेड आहे, हे दिसून येतं आहे.
त्यामुळे तरुणीने प्रत्यक्षात अजगरासोबत जेवण केलंलं नाही. त्यामुळे कधी संधी मिळाली तर अशा कोणत्याच जीवघेण्या, खतरनाक प्राण्यासोबत असं काही करण्याची भलतीच डेअरिंग करू नका. त्यांना खायला देण्याच्या प्रयत्नात तुम्हीच त्याचे शिकार व्हाल.