मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डोळ्याची पापणी लवण्याआधी अजगराने अख्खं हरिण गिळलं; शिकारीचा थरारक LIVE VIDEO

डोळ्याची पापणी लवण्याआधी अजगराने अख्खं हरिण गिळलं; शिकारीचा थरारक LIVE VIDEO

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

अजगराने हरणाच्या केलेल्या या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 02 नोव्हेंबर : प्राण्यांच्या शिकारीच बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच शिकार करणाऱ्या प्राण्यांपैकी एक म्हणजे अजगर. काही लोकांनी अजगराला प्रत्यक्षात पाहिलं असेल तर बहुतेकांनी प्रत्यक्षात नाही पण फिल्म किंवा प्राण्यांसंबंधित माहिती देणाऱ्या टीव्ही चॅनेलवर तर नक्कीच पाहिलं असेल. ज्यात अजगर शिकार करतानाही दिसला असेल. अशाच एका अजगराच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

एका अजगराने एका हरणाची शिकार केली आहे. अजगराने हरणाला ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने गिळलं आहे, ते पाहूनच सर्वजण हैराण झाले आहेत. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण अजगराने केलेली ही शिकारच इतकी भयानक आहे की तुम्हाला धडकी भरेल.

हे वाचा - नागाने दंश करताच चढला मुलाच्या रागाचा पारा; नागाचा घेतला कडकडून चावा

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक मृत हरिण दिसतं आहे. त्याच्याजवळ एक भलामोठा अजगर आहे. अजगराच्या तोंडाजवळ हरणाचं तोंड आहे. अजगर हरणाचं तोंड आपल्या जबड्यात धरतो आणि पुढे पुढे सरकताना दिसतो. काही सेकंदातच हरणाचं संपूर्ण शरीर अजगराच्या जबड्यात असतं. आपल्या डोळ्याची पापणी लवण्याआधीच अजगर हरणाला गिळतो.

अजगर हरणाची शिकार करत असताना तिथं काही लोकही आहेत. एक व्यक्ती त्या अजगराला हात लावताना दिसते आहे. तिथंच उपस्थित असलेल्यांपैकी कुणी तरी शिकारीचं हे थरारक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काही नेटिझन्सनी दिलेल्या माहितीनुसार हा बर्मिज अजगर आहे. तो सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे.

हे वाचा - दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर आला वाघ; तरुणीला जबड्यात धरून फरफटत नेलं; भयानक LIVE VIDEO

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. beautiful_new_pix इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अजगराला हरणाची शिकार करताना पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. काही युझर्सनी हा व्हिडीओ रिव्हर्समध्ये अपलोड केला असल्याचं म्हटलं आहे. अजगर इतक्या वेगाने गिळू शकत नाही, अशी कमेंट केली आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Python snake, Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal