जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! हात लावताच बॉम्बसारखा Mobile blast, तोंडावरच उडाली आग; Shocking Video

बापरे! हात लावताच बॉम्बसारखा Mobile blast, तोंडावरच उडाली आग; Shocking Video

बॉम्बसारखा फुटला मोबाईल.

बॉम्बसारखा फुटला मोबाईल.

मोबाईल ब्लास्टची भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 24 ऑक्टोबर : मोबाईल जो 24 तास आपल्यासोबत असतो. मोबाईल जितका आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे, तितकाच तो जीवासाठी धोकादायकही आहे. मोबाईल ब्लास्ट झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच एका घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणाच्या हातातच मोबाईलाच ब्लास्ट झाला आहे. ही भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मोबाईल रिपेअरिंग दुकानातील ही घटना आहे. दुकानातील तरुण मोबाईलची बॅटरी काढण्याचा प्रत्न करत होती त्याचवेळी मोबाईलचा स्फोट झाला आणि मोबाईलमधून निघालेली आग एका व्यक्तीच्या तोंडावर बसली. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भदोही वाला ट्विटर युझरने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे वाचा -  आधी एक लाख फटाके आणि मग पेटवून दिली गाडी… प्रसिद्धीसाठी तरुणांचा वेडेपण, Video Viral व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती दुकानात बसली आहे. तिच्यासमोर एक मोबाईल आहे. मोबाईल खोलून ठेवला आहे. म्हणजे तो रिपेअर केला जातो आहे.

जाहिरात

दुकानातील व्यक्ती थोड्या वेळाने त्या मोबाईलजवळ येते. जशी ती व्यक्ती मोबाईलला हात लावते, तसा मोबाईलचा ब्लास्ट होतो. बॉम्ब फुटावा तसा मोबाईल फुटतो. मोबाईला आग लागते. त्यानंतर जे घडतं ते थरकाप उडवणारं आहे. हे वाचा -  Diwali 2022 : बापरे! तोंडातील पेटत्या सिगारेटवर पेटवले रॉकेट्स आणि…; थरकाप उडवणारा VIDEO मोबाईलमधून आग बाहेर पडते आणि ती थेट मोबाईल रिपेअर करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उडते. सर्वकाही काही कळायच्या आत होतं. सुदैवाने दोघंही पटकन मागे झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात