ठाणे, 24 ऑक्टोबर : दिवाळीत सर्वत्र फटाके फुटताना पाहायला मिळत आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत फटाक्यांचा धूमधडाका दिसतो आहे. फाटाके दिसायला जितके आकर्षक तितकेच ते खतरनाक. फटाके फोडताना केलेली छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. असं असताना काही लोक मात्र फटाक्यांसोबत नको ते खेळ खेळतात. फटाक्यांसोबत असाच जीवघेणा खेळ खेळणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून पोलीसही हादरले आहेत. काही लोक फटाके हातातच फोडतात. काही जण तर स्टंटबाजी म्हणून आपल्या शरीराभोवती फटाके गुंडाळून पेटवल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. काही दिवसांपूर्वी तर हातात रॉकेट धरून सिगारेटने पेटवणाऱ्या व्यक्तीचाही व्हिडीओ चर्चेत आला होता. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तर तरुणाने हद्दच केली आहे. त्याने फक्त स्वतःचाच नव्हे तर कित्येक लोकांचा जीव धोक्यात टाकला आहे. हे वाचा - Diwali 2022 : बापरे! तोंडातील पेटत्या सिगारेटवर पेटवले रॉकेट्स आणि…; थरकाप उडवणारा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हा तरुण बिल्डिंगच्या खाली उभा राहून रॉकेट फोडतो आहे. पण हे रॉकेट तो थेट बिल्डिंगवर सोडतो आहे. चुकून वगैरे नाही तर मुद्दामहून तो इमारतीतील एका एका घरात रॉकेट सोडताना दिसतो आहे. या रॉकेटबाजमुळे नागरिक दहशततीत आहेत. काही लोकांनी या तरुणाच्या प्रतापाता व्हिडीओ बनवला आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला.
ठाण्यात तरुणाने लोकांच्या घरात सोडले रॉकेट्स; पोलिसांकडून शोध सुरू. pic.twitter.com/OWrY6dNqc6
— News18Lokmat (@News18lokmat) October 24, 2022
ठाण्याच्या उल्हासनगरमधील हे दृश्य आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ठाणे पोलीसही हादरले. ठाणे पोलीस आय़ुक्तांच्या आदेशानुसार उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा - आधी एक लाख फटाके आणि मग पेटवून दिली गाडी… प्रसिद्धीसाठी तरुणांचा वेडेपण, Video Viral त्याच्याविरोधात 285, 286, 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाचा शोध सुरू करण्यात आला आहे.