Home /News /viral /

भन्नाट! फायर पान खाल्लंत पण फायर पाणीपुरी ट्राय केली का? या आगळ्यावेगळ्या पाणीपुरीने खवय्यांना लावलं वेड

भन्नाट! फायर पान खाल्लंत पण फायर पाणीपुरी ट्राय केली का? या आगळ्यावेगळ्या पाणीपुरीने खवय्यांना लावलं वेड

या पाणीपुरीची चर्चा संपूर्ण देशात आहे

या पाणीपुरीची चर्चा संपूर्ण देशात आहे

या पाणीपुरीची तुलना होत असून, ही पाणीपुरी फायर पाणीपुरी किंवा फायर गोलगप्पा (Fire Panipuri/Fire Golgappa) म्हणून ओळखली जात आहे.

    अहमदाबाद, 06 डिसेंबर:  'खाण्यासाठी जन्म आपुला' अशी उक्ती आपल्याकडे प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाना तऱ्हेच्या खाद्यपरंपरा आपल्या देशात दिसून येतात. यातच सगळीकडे लोकप्रिय आहेत ते चाट नामक वर्गात मोडणारे पाणीपुरी, भेळ यांसारखे विविध पदार्थ. गोलगप्पा किंवा पाणीपुरी (Best Panipuri in Town) हा देशातल्या सर्वांत लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी (Street Food) एक आहे. पाणीपुरी आवडत नाही असं कोणी असेल ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या देशात कुठेही जा, पाणीपुरी, भेळ या पदार्थांची दुकानं असतातच. विशेषत: रस्त्याकडेला असणारे छोटे स्टॉल्स (best food Stalls) अशा पदार्थांसाठी लोकप्रिय असतात. एखाद्या विक्रेत्याच्या (Street Vendors) हाताची चव लोकांना आवडली, की आपोआपच त्याची प्रसिद्धी सर्वत्र होते आणि त्याच्या दुकानाबाहेर किंवा हातगाडीसमोर लोकांची झुंबड उडाल्याचे दिसते. अनेक विक्रेतेही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या ग्राहकांना काही तरी नवीन देण्यासाठीही सतत प्रयत्न करत असतात. गुजरातमधल्या (Gujrat) एका पाणीपुरी विक्रेत्याचा असाच आगळावेगळा प्रयोग भलताच यशस्वी ठरला असून, सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. त्याच्या पदार्थाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर पाणीपुरी हा पदार्थ तसा अगदीच साधासोपा... तो मिळतोही सगळीकडे; मात्र प्रत्येक राज्यात किंवा स्थानिक पातळीवर त्याच्या चवीत फरक असू शकतो. सर्वसाधारणपणे पाणीपुरी म्हणजे कुरकुरीत पुरीत आंबट गोड, तिखट पाणी असतं. ही संमिश्र चव जिभेला विलक्षण तृप्तीचा अनुभव देते. अनेक ठिकाणी आता या पाणीपुरीत अनेक नवीन प्रयोग करून नवनवीन प्रकार सादर करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, वाराणसीसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या सात प्रकारच्या चवींचं पाणी वापरून बनवलेली पाणीपुरी खायला मिळते. आणखीही काही वेगळे प्रकार यात खायला मिळतात. या पाणीपुरीला एक आगळेवेगळे रूप दिले आहे ते गुजरातमधल्या अहमदाबादमधल्या (Ahmadabad) एका पाणीपुरी विक्रेत्याने. त्याने चक्क आग ओकणारी पाणीपुरी (Fire panipuri) बनवली आहे. ही आगळीवेगळी पाणीपुरी खाण्यासाठी या विक्रेत्याकडे खवय्यांच्या रांगा लागत आहेत. याच्याकडे मिळणाऱ्या पाणीपुरीत चक्क आग असते. हा पाणीपुरीवाला ग्राहकांच्या तोंडात आग पेटलेली पाणीपुरी ठेवतो. या पाणीपुरीमध्ये कापूर असतो आणि त्यामुळे ती पेटते. खायच्या पानात अलीकडे हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. फायर पान म्हणून हे पान ओळखलं जातं. त्याच्याशी या पाणीपुरीची तुलना होत असून, ही पाणीपुरी फायर पाणीपुरी किंवा फायर गोलगप्पा (Fire Panipuri/Fire Golgappa) म्हणून ओळखली जात आहे. जेष्ठमधाचा वापर करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा असा होऊ शकतो त्रास फूड ब्लॉगर (food Blogegr) कृपाली पटेलने (Krupali Patel) या फायर पाणीपुरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अहमदाबादच्या रस्त्यांवर आपण ही पाणीपुरी ट्राय केल्याचं तिने या व्हिडिओत सांगितलं आहे. हा व्हिडिओ बघून अनेकांनी फायर गोलगप्पा या संकल्पनेची आणि कापूर वापरण्याच्या युक्तीची खिल्ली उडवली, तर अनेकांनी अशी पाणीपुरी खाणं सुरक्षित आहे की नाही याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. नेहमीची पाणीपुरी खाताना अनेक जण त्यातलं पाणी थोडे तिखट बनवण्यास सांगतात. त्या धर्तीवर या फायर पाणीपुरीबाबत एका युझरने मजेदार कमेंट केली असून, 'तिखा बोला था तो आग लगा दी; धुआँही निकाल दिया,' असं म्हटलं आहे. अनेक युझर्सनी ही पाणीपुरी कुठे मिळते याची चौकशी केली असून, तिथे भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
    First published:

    Tags: Food, India

    पुढील बातम्या