जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोठ्या उत्साहाने सरप्राईज द्यायला गेली; बॉयफ्रेंडला त्या अवस्थेत बघताच हादरली तरुणी, सर्वांसमोर असा घेतला बदला

मोठ्या उत्साहाने सरप्राईज द्यायला गेली; बॉयफ्रेंडला त्या अवस्थेत बघताच हादरली तरुणी, सर्वांसमोर असा घेतला बदला

मोठ्या उत्साहाने सरप्राईज द्यायला गेली; बॉयफ्रेंडला त्या अवस्थेत बघताच हादरली तरुणी, सर्वांसमोर असा घेतला बदला

नॅटेलीने सांगितलं की एक दिवस तिचा बॉयफ्रेंड कामात व्यग्र असल्याने त्याने फोन केला नाही. तेव्हा नॅटेलीने त्याला सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत क्लबमध्ये पोहोचली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 फेब्रुवारी : अनेकदा लोक आपल्या वेडेपणामुळे आपली चांगली नातीही बिघडवतात. त्यांना हे समजत नाही की एखादी व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करत असेल, तर तिच्यासोबत प्रामाणिक राहाणं, त्यांचं कर्तव्य आहे. प्रेमात विश्वाघात झाला की नात्यात दुरावा येऊ लागतो आणि मग कपल वेगळं होतं. इंग्लंडमधील एका महिलेनंही आपल्या धोका देणाऱ्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडलं (Cheater Boyfriend). यानंतर तिने बदला घेण्यासाठी जे काही केलं ते सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारं होतं. गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं आणि बॉईज हॉस्टेलमध्ये नेलं, पुढे जे घडलं ते….. ग्लाउसेस्टर येथे राहणाऱ्या 33 वर्षीय नॅटेली कँडलने नुकतंच द सन वेबसाईटसोबत बोलताना आपल्या आयुष्यातील एक हैराण करणारा किस्सा सांगितला. महिलेनं सांगितलं की जेव्हा ती 22 वर्षाची होती, तेव्हा ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. तो एका क्लबमध्ये बोलिंग बारमध्ये काम करायचा. नॅटेली तिथे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत जात असे. हळूहळू तिची या व्यक्तीसोबत ओळख झाली आणि दोघंही एकमेकांना डेट (Dating) करू लागले. मात्र, डेटिंगदरम्यान तीन महिन्याच्या आतच या व्यक्तीने महिलेला धोका दिला (Cheating in Love). नॅटेलीने सांगितलं की एक दिवस तिचा बॉयफ्रेंड कामात व्यग्र असल्याने त्याने फोन केला नाही. तेव्हा नॅटेलीने त्याला सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत क्लबमध्ये पोहोचली. मात्र, तिथे तिने आपला बॉयफ्रेंड क्लबमधीलच दुसऱ्या एका महिला कर्मचारीला सर्वांसमोर किस करत असल्याचं पाहिलं. ही पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेचच बदला घेण्याचा निर्णय घेतला. तिने ड्रिंक पिलं आणि मग डीजेच्या जवळ जात एक इंग्लिश गाणं वाजवलं, जे धोका देण्यावरच आधारित होतं. नॅटेली आणि तिच्या मैत्रिणींनी जोरजोरात गाणं गाण्यास सुरुवात केली. त्या नॅटेलीच्या बॉयफ्रेंडकडे इशारा करून गाणं म्हणू लागल्याने त्याचं लक्ष या तिघींकडे गेलं आणि नॅटेलीला तिथे पाहून तो हादरला.

बूट चोरण्यावरुन नवरीच्या बहिणीशी घेतला नवऱ्याच्या भावाने पंगा, VIDEO

बॉयफ्रेंडला समजलं होतं की नॅटेलीने सगळं पाहिलं आहे. या घटनेनंतर तो इतका शरमला की तिथून उठून निघून गेला. यानंतर नॅटेलीला गार्ड्सने बाहेर काढलं. मात्र बाहेर जाताच तिने पार्किंगमध्ये उभा असलेल्या बॉयफ्रेंडच्या कारवर चिखल आणि माती टाकली. यानंतर या व्यक्तीने नॅटेलीसोबत कधीच संपर्क साधला नाही. नॅटेलीचं म्हणणं आहे की आता ती ३३ वर्षांची झाली आहे आणि मागील ३ वर्षांपासून एका रिलेशनशिपमध्ये आहे. आता तिला मागच्या या गोष्टी आठवून हसू येतं. मात्र तिचं म्हणणं आहे की धोका देणाऱ्यांचा खुलासा सर्वांसमोर करायला हवा, जेणेकरून ते पुन्हा दुसऱ्या महिलांसोबत असं करणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात