जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं आणि बॉईज हॉस्टेलमध्ये नेलं, पुढे जे घडलं ते.....

गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं आणि बॉईज हॉस्टेलमध्ये नेलं, पुढे जे घडलं ते.....

गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं आणि बॉईज हॉस्टेलमध्ये नेलं, पुढे जे घडलं ते.....

यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेच्या पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियावर एका तरुणाने केलेला विचित्रप्रकार प्रचंड शेअर होतोय. खरंतर त्या घटनेवर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स आणि व्हिडीओजही व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरु, 7 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईनचा आठवडा (Valentine Week) म्हणजे तरुणांसाठी खूप खास असतो. विशेषत: कॉलेजमध्ये (valentine week in college) शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणांसाठी तर हे दिवस अतिशय गुलाबी दिवस असतात. खरंतर 7 फेब्रुवारीपासून हा व्हॅलेंटाईन आठवडा सुरु होतो. पण तरुणांच्या मनामध्ये 1 फेब्रुवारीपासूनच या गुलाबी दिवसांचा रंग चढळलेला असतो. खरंतर सगळेच तरुण कॉलजे लाईफमध्ये प्रेमात यशस्वी होतात असं नाही. काही तरुण-तरुणी मनोमनी दुखावल्याही जातात. पण प्रेम तर शेवटी प्रेम असतं. त्यातल्या यातना, त्यातलं वेंधळेपणं हे आपलंच असतं. त्यामुळे हे गुलाबी दिवस यातना देणारे जरी असले तरी हवेहवेसे वाटतात. यावर्षीच्या व्हॅलेंटाईन डेच्या पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियावर एका तरुणाने केलेला विचित्रप्रकार प्रचंड शेअर होतोय. खरंतर त्या घटनेवर सोशल मीडियावर (social media) वेगवेगळे मिम्स आणि व्हिडीओजही व्हायरल (viral) होत आहेत. सोशल मीडियावर अशा अनेक किस्स्यांबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. अशीच काहिशी कर्नाटकच्या मणिपाल कॉलेजची घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन आठवडा सुरु होण्याआधीच अशाप्रकारची घटना समोर आली आहे. या घटनेने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला हॉस्टेलच्या खोलीपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक अजब प्रयोग केला. खरं सांगायचं झालं तर असा प्रयोग याआधी तुम्ही कधीच ऐकला किंवा पाहिला नसेल. त्यामुळे हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ( आता कोणालाच दिसणार नाहीत तुमच्या Insta Post चे लाइक्स आणि View; असे करा Hide ) मणिपूर कॉलेजचा एक तरुण हा बॉईज हॉस्टेलमध्ये राहतो. तो 1 फेब्रुवारीला भारी वजनाची बॅग घेऊन हॉस्टेलच्या गेटमध्ये शिरला. बॅगेचं वजन जास्त असल्याने त्याला ती बॅग आपल्या खोलीपर्यंत घेऊन जाण्यात प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागत होती. तो खोलीकडे जात असताना नेमकं हॉस्टेलमधल्या एका केअरटेकरची नजर त्याच्याकडे गेली. केअरटेकरने त्याला काही प्रश्न विचारले तर तो तरुण घाबरला. त्याला घाम फुटायला लागला. केअरटेकरला संशय आला. अखेर ती बॅग उघडावी लागली. बॅगेत एक मुलगी पोटात पाय घालून गपचूप बसली होती. मुलीला बॅगेत बघून केअरटेकरलाही झटका बसला. तो चक्रावून गेला. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण हॉस्टेल, कॉलेज, त्यापाठोपाठ शहर आणि सोशल मीडियावर चर्चेत आलं. संबंधित घटनेविषयीची माहिती सोशल मीडियावर जशी आली तेव्हापासून लोकांच्या आतमध्ये असणारी क्रिएटिव्हिटी भरभरुन बाहेर येत आहे. #ManipalSuitacase या नावाने हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. या हॅशटॅगचा वापर करुन युजर प्रचंड विनोदी मिम्स शेअर करत आहेत.

जाहिरात

विशेष म्हणजे प्रकरण आता इतकं जगजाहीर म्हटल्यावर मिम्सचे बादशाह zomato का मागे राहील? झोमॅटोने देखील ट्विटरवर एक फोटो शेअर करत एक विनोदी कॅप्शन दिलं आहे. ते वाचून तुमचंही हसू आवरलं जाणार नाही.

जाहिरात

काही लोकांनी जु्न्या व्हिडीओंना टॅग करुन या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सूटकेसमध्ये सापडलेली मुलगी आणि तिला आणणारा तिचा बॉयफ्रेंड मित्राला कॉलेजने सस्पेंड केलं असून त्यांना घरी पाठवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात