जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या तोंडाने श्वास दिला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या तोंडाने श्वास दिला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या तोंडाने श्वास दिला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

सापाचं असं रेस्क्यू ऑपरेशन (Snake rescue video) तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायपूर, 02 जून : साप (Snake) म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. त्यामुळे साप दिसताच किती तरी लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सापाचा जीव घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ (Snake video) व्हायरल होतो आहे, ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला (Cobra video) वाचवण्यासाठी धडपडतो आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या तरुणाने चक्क विषारी कोब्राला **(Cobra Snake)**आपल्या तोंडाने श्वास दिला आहे (Man give breath to cobra by his mouth) आणि त्याच्यात पुन्हा जीव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सापाचं असं रेस्क्यू ऑपरेशन (Snake rescue video) तुम्ही कधीच पाहिलं नसेल. एका विषारी कोब्राला मृत्यूच्या (Cobra rescue video) दारातून परत आणण्यासाठी तरुणाने जीवघेणा असा प्रयोग केला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ छत्तीसगढच्या बस्तरमधील (Bastar) आहे. एका घरात हा कोब्रा घुसला होता. त्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्रांची टीम याठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी सापाला घरातून बाहेर काढलं. त्याला मोकळ्या जागेत आणलं. जवळपास 8 ते 10 फूट लांब हा साप पाहताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. सापाला जमिनीवर ठेवलं  पण त्याची हालचाल होत नव्हती. हे वाचा -  भरमंडपात वधूच्या पायावर नतमस्तक झाला नवरदेव; काय आहे या VIRAL PHOTO मागील रिअल स्टोरी साप श्वास घेऊ शकत नाही आहे, ही बाब सर्पमित्रांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता या सापाचा जीव वाचण्यासाठी धडपड सुरू केली.  व्हिडीओत पाहू शकता या तरुणाने आपल्या हातात मृतावस्थेत असलेल्या एका सापाला घेतलं आहे. त्या सापाच्या तोंडात त्याने एक छोटासा पाइप टाकला आहे, हाच पाइप या तरुणाच्याही तोंडात आहे. कोल्डड्रिंक पिण्यासाठी जो स्ट्रॉ वापरला जातो, त्या स्ट्रॉचा त्यांनी वापर केला. सापाला तोंडाजवळ धरून त्याचं तोंड उघडून तो पाइपावाटे आपला श्वास त्या सापाला देतो आहे आणि त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे वाचा -  एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि…; समुद्रातील थरारक VIDEO त्याचा हा प्रयत्न यशस्वीसुद्धा होतो. काही वेळातच सापाची हालचाल झाली. सापाच्या थांबलेल्या श्वास तरुण आपला श्वास देऊन सुरू करतो. त्यानंतर त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणीसुद्धा सोडून येतो. असं करताना त्याच्या जीवालाही मोठा धोका होता. जर सापाने मध्येच त्याच्यावर हल्ला केला असता तर ते त्याच्या जीवावरही बेतलं असतं. या सर्पमित्राचं कौतुक होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात