मुंबई, 02 जून : एखाद्या मृत व्यक्तीला (Dead person) श्रद्धांजली वाहायला गेल्यानंतर किंवा मृतदेहावर (Deadbody) अंत्यसंस्कार होत असताना अचानक मृतदेह उठणं किंवा त्याची हालचाल (Deadbody moving) होणं, अनेक हॉरर फिल्ममध्ये (Horror film) किंवा सीरिअलमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ऑनस्क्रिन असे सीन पाहतानाच आपल्याला घाम फुटतो, पण प्रत्यक्षात (Horror video) असं घडलं तर काय? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. श्रद्धांजली वाहत असताना अचानक मृतदेह शवपेटीत उठून बसला.
मृतदेहाचा हा शॉकिंग व्हिडीओ (Shocking video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून लोक हैराण झाले आहे. मृत व्यक्ती अचानक शवपेटीत उठूनच बसली. त्यावेळी या मृत व्यक्तीला श्रद्धांजली दिली जात होती, त्याचं अंतिम दर्शन सुरू होतं.
Hold my beer while I take this man’s soul. pic.twitter.com/38P5LX5w89
— Hold My Beer (@HldMyBeer) May 31, 2021
व्हिडीओत पाहू शकता, या मृत व्यक्तीचे काही मित्रमैत्रिणी त्याला शेवटचं पाहण्यासाठी आले आहेत. ते सर्वजण त्याच्या मृतदेहाजवळ रडताना दिसत आहे. अचानक मृत व्यक्ती शवपेटीत उठून बसते. त्यानंतर त्याच्याजवळील सर्व लोकांचा थरकाप उडतो. सर्वजण सैरावैरा पळत सुटतात. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला आपणही हैराण होतो.
हे वाचा - विषारी कोब्राला तरुणाने तोंडाने श्वास दिला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO
पण व्हिडीओ नीट पाहाल तर त्यात जण हसतानाही दिसत आहेत आणि ते अगदी शांत आहेत. फक्त एकच व्यक्ती खूप घाबरलेली दिसते आहे. ती व्यक्ती इतकी घाबरलेली आहे की संपूर्ण घरभर पळते आणि नंतर एका खोलीत जाऊन दरवाजाच बंद करून घेते. यावरून का व्हिडीओ मजा किंवा प्रँक म्हणून बनवण्यात आला आहे, असंच वाटतं आहे.
हे वाचा - युवकाच्या घरात राहाणारी ही महिला नेमकी कोण होती? VIDEO पाहून उडेल थरकाप
होल्ड माय बिअर या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dead body, Shocking viral video, Viral, Viral videos