मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Yuck! Online dating वेळी त्याने सांगितलं त्याचं घाणेरडं सिक्रेट; महिलेनं ताबडतोब ब्लॉक केलं

Yuck! Online dating वेळी त्याने सांगितलं त्याचं घाणेरडं सिक्रेट; महिलेनं ताबडतोब ब्लॉक केलं

ऑनलाईन डेटिंगमध्ये व्यक्तीने महिलेला जे सांगितलं ते ऐकून तिला किळस आला.

ऑनलाईन डेटिंगमध्ये व्यक्तीने महिलेला जे सांगितलं ते ऐकून तिला किळस आला.

ऑनलाईन डेटिंगमध्ये व्यक्तीने महिलेला जे सांगितलं ते ऐकून तिला किळस आला.

मुंबई, 26 नोव्हेंबर : सध्या ऑनलाइन डेटिंगची (Online dating) चलती आहे. इंटरनेटच्या माध्यमातून लोक एकमेकांशी जोडले जात आहेत. त्यांच्या ओळखी वाढतात, चॅटिंग सुरू होतं. त्यातल्या कुणाशी मतं जुळली तर रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी लोक तयार असतात; पण ऑनलाइन डेटिंगबद्दल अनेक नकारात्मक गोष्टीही आहेत. त्यामुळे ऑनलाइन डेटिंग ऐकायला सोपं वाटलं तरी ते तितकंसं सोपं नाही. एका महिलेनं ऑनलाइन डेटिंग करत असलेल्या एका व्यक्तीला का ब्लॉक केलं (Woman Blocks Online Date) हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

मम्सनेट नावाची एक वेबसाइट आहे. या वेबसाइटवर जगभरातल्या माता (आई) रजिस्टर करतात आणि आपले अनुभव शेअर करतात. एका महिलेनं नुकताच तिचा अनुभव शेअर केला आहे. या महिलेनं आपलं नाव उघड केलेलं नाही आणि अगदी विचित्र किस्सा सांगितला आहे. या महिलेचा घटस्फोट झाला आहे आणि तिला मुलंही आहेत. जवळपास पाच महिने ब्रेक घेतल्यानंतर तिला पुन्हा डेटिंग करावंसं वाटलं. तिनं एका डेटिंग साइटवर एका व्यक्तीशी चॅटिंग सुरू केलं; मात्र नंतर त्या व्यक्तीनं एक अत्यंत किळसवाणी गोष्ट (Man Discussed Weird Thing on Date) तिला सांगितली. त्यामुळे या महिलेनं त्या व्यक्तीला ब्लॉकच केलं.

हे वाचा - काय म्हणावं याला! हटके प्रपोज करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट

ही महिला एका व्यक्तीबरोबर ऑनलाइन डेटिंग (Online Dating) करत होती. या दोघांमध्ये मेसेजेसच्या माध्यमातून भरपूर गप्पाही झाल्या. ती व्यक्ती चांगली असावी असं या महिलेला वाटू लागलं होतं; मात्र एके दिवशी त्या व्यक्तीनं सांगितलं, की त्यानं भरपूर कांदा घालून जेवण तयार केलं आहे. त्यानं सगळं खाणं डब्यात ठेवलं आहे. ते सगळं तो खाणारच आहे; पण त्यानंतर मात्र त्याला भरपूर गॅसेस होणार आहेत. तो खूप पादणार आहे हे नक्की. हे ऐकल्याबरोबर त्या महिलेला अत्यंत किळस वाटली आणि त्याला ताबडतोब ब्लॉक करावं असा विचार तिनं केला; मात्र तिच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी तिनं याबद्दलची एक पोस्ट वेबसाइटवर टाकली. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.

हे वाचा - अजब कायदा! इथं रात्री टॉयलेट वापरावर बंदी; साधा पाण्याचा आवाज आला तरी शिक्षा

त्या व्यक्तीला या महिलेबरोबर मोकळेपणानं बोलावंसं वाटलं असेल म्हणूनच तो असं बोलला असेल, असं काही जणांना वाटलं. यात काही चुकीचं नाही अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. त्यानं महिलेचा अनादर किंवा अपमान केला नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. ही महिला अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडते म्हणूनच ती एकटी आहे असं काही जणांचं म्हणणं होतं. काही जणांनी मात्र या महिलेचं समर्थन केलं. आज तो असं बोललो, उद्या कदाचित यापेक्षाही घाणेरडं काही तरी बोलेल. त्यामुळे या व्यक्तीला ताबडतोब ब्लॉक केलं पाहिजे, असं एकानं लिहिलं होतं.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Online dating, Relationship