मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अजब कायदा! इथं रात्री Toilet वापरावर बंदी; टॉयलेटमधून पाण्याचा आवाज आला तरी शिक्षा

अजब कायदा! इथं रात्री Toilet वापरावर बंदी; टॉयलेटमधून पाण्याचा आवाज आला तरी शिक्षा

इथं टॉयलेट वापरासंबंधी विचित्र नियम आहेत.

इथं टॉयलेट वापरासंबंधी विचित्र नियम आहेत.

इथं टॉयलेट वापरासंबंधी विचित्र नियम आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26 नोव्हेंबर : रस्त्यावर थुंकू नये, लघवी किंवा शौच करू नये, कचरा टाकू नये आपल्याला माहिती असलेले हे स्वच्छतेसंबंधी काही नियम. ज्याचं उल्लंघन केलं तर दंडही भरावा लागतो (Sanitization). पण सरकारने तुम्हाला शौचालयात जाऊन फ्लश करू नका, असं सांगितलं तर आश्चर्याचा मोठा धक्काच बसेल नाही का? पण हा विचित्र कायदा (Weird Law) एका देशात आहे. जिथं एका विशिष्ट वेळेत टॉयलेटमध्ये फ्लश करण्यास बंदी आहे (Toilet flusing at night ban) आणि तसं केलं तर त्याला शिक्षेला सामोरं जावं लागतं  (Toilet use ban at night).

देशात शांतता, सुव्यवस्था राहावी यासाठी काही नियम, कायदे असतात. प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे कायदे असतात. असाच टॉयलेटसंबंधी हा विचित्र कायदा आहे तो स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland Weird Law)  जिथं रात्री दहा वाजल्यानंतर तुम्हाला टॉयलेटमध्ये फ्लश करता येत नाही.

सामान्यपणे कायदे-नियम हे सार्वजनिक किंवा व्यापक स्वरूपात परिणाम करणाऱ्या गोष्टींसाठी लागू असतात. पण स्वित्झर्लंडमधील हा नियम फक्त सार्वजनिक शौचालयात लागू आहे, असं नाही तर अगदी तुम्हाला घरच्या वैयक्तिक शौचायलाबाबतही हाच नियम लागू होतो.

हे वाचा - मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाहीयेत पुरुष; तरुणीच्या भूताशीही लग्न करण्याची तयारी

स्वित्झर्लंडमधील या विचित्र कायद्यानुसार याला ध्वनी प्रदूषण मानलं जातं कारण यामुळे इतरांच्या झोपेत व्यत्यय येतो. तरी तुम्ही या नियमाचं उल्लंघन केलं आणि रात्री टॉयलेटमध्ये फ्लश केलं तर हा गुन्हा मानला जातो, ज्यासाठी दंड भरावा लागू शकत. तसंच कठोरात कठोर शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे टॉयलेटमधून पाण्याचा आवाज आला तरी तुम्ही अडचणीत येऊ शकता.

हे वाचा - या पठ्ठ्यानं टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा, बॉसही ठरला शेरास सव्वाशेर

सिंगापूरमध्येही टॉयलेटसंबंधी असाच एक कायदा आहे. जिथं टॉयलेट वापरल्यानंतर तुम्ही फ्लश केलं नाही तर 150 डॉलर म्हणजे तब्बल 8000 रुपयांचा दंड भऱावा लागतो. जर दंड भरला नाही तर त्याला तुरुंगात पाठवलं जातं.

First published:

Tags: Law, Lifestyle