मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! बोटीतून पडला तरुण तो थेट पाणघोड्याच्या जबड्यात आणि...; अंगावर काटा आणणारी घटना

Shocking! बोटीतून पडला तरुण तो थेट पाणघोड्याच्या जबड्यात आणि...; अंगावर काटा आणणारी घटना

पाणघोड्याच्या जबड्यात म्हणजे थेट मृत्यूच्या दारातच पोहोचला होता तरुण.

पाणघोड्याच्या जबड्यात म्हणजे थेट मृत्यूच्या दारातच पोहोचला होता तरुण.

पाणघोड्याच्या जबड्यात म्हणजे थेट मृत्यूच्या दारातच पोहोचला होता तरुण.

  • Published by:  Priya Lad
हरेरे, 11 फेब्रुवारी : पाण्यातून प्रवास करणं जितका आनंददायी आहे तितकाच धोकादायक आहे. शांत पाण्यात बरेच खतरनाक प्राणीही असतात जे कधी डाव साधतील सांगू शकत नाही. अशा बऱ्याच हॉलिवूड फिल्मही तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये कलाकार जंगलामध्ये पाण्यात बोटीतून प्रवास करत असतात आणि त्यांना पाण्यातील अशा भयंकर प्राण्यांचा सामना करावा लागतो. फिल्मी वाटावी अशाच एका प्रत्यक्ष घटनेचा थरारक अनुभव एका व्यक्तीने सांगितला आहे. एक व्यक्ती पाण्यात बोटीतून प्रवास करताना पाणघोड्याच्या जबड्यातच गेली (Man swallowed by Hippopotamus). त्यानंतर त्याच्यासोबत पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. पॉल टेम्पलर (Paul Templer)  असं या व्यक्तीचं नाव आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार पॉल 7 न्यूज वर ही संपूर्ण घटना सांगितली. ही घटना 1996 सालची आहे. त्यावेळी पॉल झिम्बॉब्वेमध्ये (Zimbabwe)  सफारी गाइड म्हणून काम करत होता. पॉलने सांगितले, एकदा तो काही पर्यटकांसोबत बोटीमार्फक नदीतून प्रवास करत होता. तेव्हा अचानक हिप्पो म्हणजे पाणघोडा आला. पाणघोड्याने बोटीवर हल्ला केला. त्यामुळे पॉलसोबत असललेला नाविक पाण्यात पडला. पॉलने लगेच पर्यटकांना नदीकिनाऱ्यावर उतरवलं आणि आपल्या सहकार्याला वाचवायला गेला. पण त्याच्यावरही पाणघोड्याने हल्ला केला. हे वाचा - VIDEO : वाचवा...वाचवा...; पालीला पाहताच तरुणीने अख्खं रेस्टॉरंट हलवून टाकलं जसं त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी त्याला आपला हात दिला, तसा अचानक एक पाणघोडा आपला भलामोठा जबडा खोलत पाण्यातून बाहेर आला. त्यानंतर मात्र पॉलसमोर अंधारच अंधारच होता. आपण पाण्यात असावं असं त्याला सुरुवातीला वाटलं. पण त्याला अंड्यासारखा दुर्गंध येऊ लागला. मग त्याला समजलं आपण पाणघोड्याच्या तोंडात आहोत (Man half eaten by Hippo). पॉलचा डोक्यापासून कमरेपर्यंतचा भाग पाणघोड्याच्या जबड्यात होता. कसंबसं करून तो त्याच्या जबड्यातून बाहेर आला. पाणघोड्यानेही त्याला सोडलं. पण त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होता. त्याचा हात तर एखाद्या कबाबसारखाच झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला पण गंभीर जखमांमुळे त्याचा एक हात कापावाच लागला. हे वाचा - 3-3 बलाढ्य सिंहांनाही भारी पडलं एक छोटंसं कासव; कधीच पाहिला नसेल असा VIDEO या घटनेनंतर आपण पुन्हा त्या ठिकाणी गेलो. त्यावेळी तो पाणघोडा एकदा त्यांना दिसला पण त्यानंतर तो दिसला नसल्याचं त्याने सांगितलं.
First published:

Tags: Wild animal, Zimbabwe

पुढील बातम्या