Home /News /viral /

VIDEO : 'आता स्वयंपाक घरातही लॉक डाऊन करा', संतप्त गृहिणीची मोदींना विनंती

VIDEO : 'आता स्वयंपाक घरातही लॉक डाऊन करा', संतप्त गृहिणीची मोदींना विनंती

कोरोनामुळे अनेक नोकरदारांचे Work From Home सुरू आहे. अशावेळी अनेकजण सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत आहेत. मात्र यामुळे गृहिणींचं काम खूप वाढलं आहे.

  मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते संकट पाहता लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. देशातील अनेक राज्ये आणि जिल्ह्यांनी लॉकडाउन केले आहे. काहींनी स्वत:हून घरात बंदिस्त केले आहे. काही जणांचे Work From Home सुरू आहे. अशावेळी अनेकजण सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत आहेत. (हे वाचा-VIDEO : दोस्त दोस्त ना रहा! पोलिसांचा दंडूका पडताच पाहा काय केलं) सध्या सोशल मीडियावर TikTok वरील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पीएम मोदी यांना शहराप्रमाणे घराचे स्वयंपाकघर लॉकडाऊन करण्याचे आवाहन करीत आहे. ही महिला व्हिडिओमध्ये आपल्या नवऱ्याला उद्देशून ही विनंती करत आहे. 'जसं आपण संपूर्ण भारतात लॉकडाउन केलं आहे, तसेच आपण स्वयंपाकघर देखील लॉकडाउन करा, अन्यथा दर अर्ध्या तासाला चहा, चिप्स, पकोडे, चपाती, भात असं सर्वजण काहीतरी मागत आहे.’
  @komalashish01jai hind😅😅hum ladies kisi waat lg jaye ♬ original sound - komalAshish422291
  या व्हिडीओवर हजारो लाइक्स आले असून जवळपास 2 हजार कमेंट्स आल्या आहेत. अनेक गृहिणींना या व्हिडीओतील महिलेचं म्हणणं पटत आहे. त्यामुळे त्यावर भरमसाठ कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आता गृहिणींची जबाबदारी वाढली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. दरम्यान देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. सर्वांनी घरात राहुनच काम करण्याचे आवाहन पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या