जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध नाही, व्हर्जिन तरुणी प्रेग्नंट; कारणही शॉकिंग

कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध नाही, व्हर्जिन तरुणी प्रेग्नंट; कारणही शॉकिंग

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ना पुरुषाशी संबंध, ना आयव्हीएफ केलं तरी एक व्हर्जिन तरुणी प्रेग्नंट झाली आहे. तिने आपल्या प्रेग्नन्सीबाबत केलेला दावाही धक्कादायक आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 02 जून : प्रेग्नन्सी म्हटलं की त्यासाठी स्त्री आणि पुरुषाचं मिलन होणं आवश्यक. याशिवाय आता पुरुषांशी संंबंध न ठेवता आयव्हीएफच्या मदतीनेही प्रेग्नंट होता येतं. पण एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात ना पुरुषाशी संबंध, ना आयव्हीएफ केलं तरी एक व्हर्जिन तरुणी प्रेग्नंट झाली आहे. तिने आपल्या प्रेग्नन्सी बाबत केलेला दावाही धक्कादायक आहे. कोलंबियात राहणारी 19 वर्षांची ही तरुणी. जिच्या प्रेग्नन्सीमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनेलशी बोलताना ती म्हणाली, तिने कधीच कोणत्याच पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवले नाही, तरी ती गरोदर राहिली. धक्कादायक म्हणजे तिने तिच्या गर्भधारणेसाठी भूत जबाबदार असल्याचा दावा केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ती म्हणाली, तिला एक अलौकिक शक्ती जाणवत होती. वाईट स्वप्नंही पडायची. काही दिवसातच तिची मासिक पाळी थांबली. तिची आई तिला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन गेली तेव्हा ती गरोदर असल्याचं निदान झालं. तेव्हा तिला आपण प्रेग्नंट असल्याचं समजलं. मुलाच्या मृत्यूनंतर ‘चमत्कार’! 68 वर्षांची अभिनेत्री प्रेग्नंट, पोटात वाढू लागलं मृत लेकाचंच बाळ ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, तरुणीच्या प्रेग्नन्सीची ही कहाणी ऐकून सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. पालकांना सत्य सांगू शकत नसल्याने ती खोटं बोलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी या तरुणीची बाजूही घेतली आहे. अशा घटना यापूर्वीही ऐकल्या आहेत, त्यामुळे हे पूर्णपणे नाकारता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा…; प्रेग्नन्सी रोखण्यासाठी 8 भयंकर पद्धती प्रेग्नन्सीच्या या विचित्र प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात