माद्रिद, 15 एप्रिल : कुणाचा मृत्यू झाला आणि काही वर्षांनी त्याच घरात एखादी महिला प्रेग्नंट झाली की तिचं होणारं मूल म्हणजे ती मृत व्यक्ती परत आली असं म्हटलं जातं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक महिला जिच्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ती स्वतःच प्रेग्नंट झाली. आश्चर्य म्हणजे तिच्या पोटात तिच्याच मुलाचं बाळ वाढत होतं. आता हे कसं शक्य आहे? मुलाच्या मृत्यूनंतर असा चमत्कार कसा झाला? स्पेनमधील ही घटना आहे. 68 वर्षांची अॅना ओब्रेगॉन एक स्पॅनिश अभिनेत्री आहे. आता या वयात प्रेग्नन्सी शक्य नाही. पण ती प्रेग्नंट झाली. आश्चर्य म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर ती प्रेग्नंट झाली आणि तिच्या पोटात तिच्या मुलाचाच अंश वाढू लागला.
अॅनाचा 27 वर्षांचा मुलगा एलेस ज्याला कॅन्सर झाला होता. दोन वर्षे तो कॅन्सरशी झुंज देत होता. अॅनाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण कर्करोगाशी त्याचा लढा अपयशी ठरला. 2020 साली त्याचा मृत्यू झाला. एलेस जग सोडून गेला. पण त्यानंतर अॅना प्रेग्नंट झाली. आश्चर्य! गेली 15 वर्षे प्रेग्नंट आहे महिला, एक-दोन नव्हे तर तब्बल 12 मुलं; कारणही विचित्र द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, एलेसची वडील होण्याची इच्छा होती. आपण कॅन्सरमधून बरं होऊ आणि आपला संसार थाटू, अशी आशा एलेसला होती. त्याने केमोथेरेपीपूर्वी शुक्राणूही गोठवले होते. आपलं मूल या जगात यावं आणि आपण त्याचा जन्म होताना त्याला पाहावं, अशी त्याची इच्छा होती. ज्या आठवड्यात मुलाचा मृत्यू झाला, त्याच आठवड्यात त्याने आईला वडील होण्याचं स्वप्न सांगितलं होतं. हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याला मृत्यूने कवटाळलं. पण त्याची ही शेवटची इच्छा पूर्ण करायची असं त्याच्या आईने ठरवलं. सरोगसीच्या मदतीने अॅना स्वतःच्या मुलाची आई बनली.स्पेनमध्ये सरोगसीवर बंदी आहे, त्यामुळे तिने अमेरिकेत सरोगसी केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती प्रेग्नंट झाली. 20 मार्च, 2023 ला तिची डिलीव्हरी झाली. मियामीच्या रुग्णालयात तिने एका मुलीला जन्म दिला. आपल्या पहिल्या बाळाचं नाव आपल्या नावावरून असावं अशीही एलेसची इच्छा होती. त्यामुळे तिचं नाव अॅना सँड्रा लिक्विओ ओब्रेगोन असं ठेवलं आहे. कसं शक्य आहे? निर्जीव बाहुल्याने केलं प्रेग्नंट; दुसऱ्यांदा गरोदर असल्याचा महिलेचा अजब दावा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अॅनाला ती गरोदर असल्याचं कळलं आणि डिसेंबरमध्ये तिला मुलगी होणार असल्याचं कळलं. अॅनाने 20 मार्च रोजी मियामीच्या रुग्णालयात एलिसची मुलगी अनिताला जन्म दिला. कायदेशीररित्या मूल हे अना यांचे आहे. एलिसने एकदा आपल्या आईला सांगितले होते की तो आपल्या पहिल्या मुलाचे नाव तिच्या नावावर ठेवेल. हे लक्षात घेऊन अॅनाने या चिमुरडीचे नाव अॅना सँड्रा लिक्विओ ओब्रेगोन असे ठेवले आहे.
वयाच्या 68 व्या वर्षी अॅनाने स्वतःच्या नातीला जन्म दिला. त्यामुळे ती खूप आनंदी आहे. पण आपला मुलगा हा क्षण पाहायला नाही, याचं दुःखही तिला आहे.