बँकॉक, 21 जानेवारी : अनेकांना दोरीउड्या मारायला आवडतात. काही जणांच्या तर दैनंदिन एक्सरसाइझचा हा एक भाग आहे. फिट राहण्यासाठी ते लोक नियमित दोरीच्या उड्या मारतात. दोरी उड्या मारणाऱ्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये दोरी उड्या मारता मारता तिच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली आहे (Woman accident during skipping rope). हा व्हिडीओ थायलँडच्या (Thailand) राडचाबुरी प्रांतातील आहे. 44 वर्षांची बेंजारत पुट्टाखुन नदीकिनारी असलेल्या पोर्टवर दोरीड्या मारत होती. एक्सरसाईझ करताना तिचा व्हिडीओ शूट केला जात होता, त्यामुळे तिच्यासोबत घडलेली ही दुर्घटनासुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. @thandojo नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - साप…साप…! महिलेने पोलिसांनाही बोलावलं; जे सापडलं ते पाहून लपवावं लागलं तोंड ही महिला पोर्टवर लाकडी प्लॅटफॉर्मवर उडी मारत होती. काही उड्या मारल्यानंतर अचानक प्लॅटफॉर्मला मोठा खड्डा पडला आणि महिला त्या खड्ड्यातून खाली पडली.
Hop, skip and splash! Moment skipping woman crashes through wooden jetty and plunges into the river below
— Hans Solo (@thandojo) January 19, 2022
She clung to the sides of the gap and shouted for help before her teenage sons came and pulled her out of the hole. pic.twitter.com/I85gY9EN1H
सुदैवाने खड्ड्यातून पडताच तिने आपले दोन्ही हात प्लॅटफॉर्मला घट्ट धरून ठेवलं आणि मदतीसीठी ओरडू लागले. तिचा आवाज ऐकून तिथं उपस्थित असलेले लोक तिच्या मदतीसाठी धावून आले. तिला खेचून बाहेर काढण्यात आलं. तिच्या हातापायाला खरचटलं आहे. पण गंभीर दुखापत झाली नाही. हे वाचा - Live असताना महिला पत्रकाराचा अपघात; मागून गाडीने दिली धडक, Video Viral डेली मेल च्या रिपोर्टनुसार बेंजारतने सांगितलं की फक्त 50 किलोची आहे. तरी जिथं ती उड्या मारत होती तो प्लॅटफॉर्म असा तुटल्याने ती हैराण झाली आहे. प्लॅटफॉर्म इतका कमजोर आहे, याची माहिती तिला नव्हती. त्यामुळे आता तुम्ही दोरीउड्या मारेल तर जागा नीट पाहा, असा सल्ला तिने इतरांना दिला आहे.