नवी दिल्ली, 13 मे : वन्य प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जंगलातील अनेक विचित्र, भयानक हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालतात. अशातच प्राण्यांच्या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यावेळी वाघ आणि वाघिणीच्या हा भांडणाचा व्हिडीओ सोशळ मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघिणीने हरणाची शिकार केली असून ती आरामात बसून तिचं अन्न खात आहे. ती हरणाला खात असताना तेवढ्यात तिथे वाघ येतो आणि वाघिणीचं अन्न खायला लागतो. हे पाहून वाघिण संतापते आणि वाघावर हल्ला चढवते.
वाघ आणि वाघिणीमध्ये जोरदार भांडण होते आणि शेवटी वाघ वाघिणीला तिथून हरवण्यात यशस्वी होतो. वाघ त्या हरणाला ओढत झाड्यांमध्ये घेऊन जातो. वाघिण मात्र भगतच राहते. शिकार करुनही तिच्या हाताला ते लागत नाही. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की हा व्हिडिओ रणथंबोर नॅशनल पार्कचा आहे आणि तो मूळ विजय कुमावत यांनी शूट केला आहे. ही पोस्ट दोनच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून ते 2200 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ Latest Sightings नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. 2 मिनिट 41 सेकंदांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला असून वाघ वाघिणीच्या व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत.