मुंबई, 12 मे : हत्ती शरीराने अवाढव्य प्राणी असला तरी वाघ, सिंह, बिबट्या अशा प्राण्यांची जितकी भीती वाटते तितकी हत्तीची वाटत नाही. कारण आपण एरवीसुद्धा हत्तीला पाहतो. हत्ती दिसताच गजराज म्हणून आपण त्याला हात लावून आशीर्वादही घेतो. अशीच एक व्यक्ती जी गाडीने जात असताना अचानक गजराजाचं दर्शन झालं आणि ही व्यक्ती गाडीतून रस्त्यावर उतरत त्या गजराजासमोर त्याचे आशीर्वाद घ्यायला गेली. पण पुढे जे घडलं ते थरकाप उडवणार आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हत्ती तसा शांत प्राणी पण तो चवताळला तर त्याच्यासारखा खतरनाक प्राणी दुसरा कोणता नाही. त्यामुळे हत्तीसमोर जाण्याची हिंमत शहाण्या माणसाने करूच नये. एका व्यक्तीने हीच चूक केली. जंगलाजवळून जात असताना रस्त्याकिनारी एक हत्ती दिसला. ही व्यक्ती गाडीतून उतरून त्या हत्तीसमोर गेली. काही लोक त्या व्यक्तीला रोखत आहेत पण ती कुणाचंच ऐकत नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हत्तीसमोर जात या व्यक्तीने हात जोडले. माणसाला पाहून हत्ती तसा घाबरला आहे. आपल्याला यापासून धोका आहे, असं समजून तो दोन पावलं मागे जातो. पण ही व्यक्ती त्याच्यासमोर जाते. हत्ती सोंडने माती उडवून त्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. पण व्यक्ती काही घाबरत नाही. ती हत्तीसमोर हात जोडते. बंदिस्त वाघाला हलक्यात घेणं पडलं महागात; मजेमजेत पिंजऱ्यात हात टाकताच…; थरकाप उडवणारा VIDEO त्यानंतर ही व्यक्ती हत्तीकडे पाठ करून उभी राहते. आपले दोन्ही हात वर करून कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देते. हत्ती त्याच्या पाठी झुडुपामागे आहे. तो झुडुपांमधून येत त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्नही करताना दिसतो. पण तो हल्ला करत नाही. ही व्यक्ती पुन्हा त्या हत्तीकडे फिरते आणि हात जोडत नतमस्तक होते. शेवटी हा हत्ती म्हणजे गजराज. देवासारखा म्हणून त्याचे आशीर्वाद घेते. पण शेवटी तो जंगली हत्ती. माणूस म्हणजे त्याच्यासाठी धोका. त्यामुळे माणूस जवळ येताच तो चवताळतो आणि घाबरवून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून हत्तीने त्याच्यावर हल्ला केलेला नाही. पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून संतापला हत्ती, केलं असं काही….पाहा Video IFS अधिकारी रमेश पांडे यांनी त्यांच्या @rameshpandeyifs ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, व्यक्तीचे हे पाऊल आत्महत्येसारखे होते. कृतज्ञतापूर्वक गजराजनं त्याचं कृत्य सहन केलं आणि त्याला सोडून दिलं.
It was suicidal, even then the gentle giant tolerated the man and let him go.
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) May 11, 2023
Via: @Saket_Badola pic.twitter.com/27F6QHstkn
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून हत्तीने काही केलं नाही, असं म्हटलं. काहींनी हत्तीचं कौतुक केलं तर या व्यक्तीबाबत संतापही व्यक्त केला आहे.