मुंबई, 20 जून : सोशल मीडियाच्या दुनियेत व्हिडीओची कमी नाही. इथे कधी मजेदात तर कधी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे प्राणी प्रेमींची देखील कमी नाही, त्यामुळे प्राणांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी शिकारीचे व्हिडीओ असतात तर कधी क्यूट प्राण्यांचे सध्या समोर आलेला व्हिडीओ मात्र तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकवेल. या व्हिडीओमध्ये एक मादी जग्वार पाण्यात राहून पाण्यातील सर्वात धोकादायक प्राण्याची शिकार करताना पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला जग्वार किती धोकादायक आहे हे समजेल. तो रागावलेल्या बैलासमोर झोपला, बैल धावत आला आणि… Video पाहण्याची हिंमत असेल तरच पाहा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मादी जग्वार शांतपणे पाण्याखाली लपून बसल्याचे दिसून येते. कधी ती श्वास घेताना तर कधी हालचाल करताना दिसते. तेव्हा अचानक ती मगरीवर हल्ला करते. त्यानंतर मगरीला ती पाण्यातून बाहेर काढत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला पसंती देत आहेत.
या व्हायरल व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. खरोखच हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. कारण एवढ्या जवळून दोन्ही धोकादायक प्राण्यांमधील लढाईचं साक्षीदार होणं काही सोपं काम नाही.