मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा

एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर वाईल्ड लाईफ संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 30 नोव्हेंबर : आपल्याला तर हे माहित आहे की सिंह हा जंगलाचा राजा आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात. कारण एकदा का त्याच्या हातात कोणी लागलं तर त्याचे प्राणी वाचणे अशक्यच.

पण असं असलं तरी सोशल मीडियावर वाईल्ड लाईफ संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

हे ही पाहा : मगरीचा सापावर हल्ला, या लढाईत कोण जिंकेल सांगा? पाहा Viral Video

हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे सांगितले जात आहे. म्हशींच्या कळपाने सिंहासोबत असं काही केलं की त्याला पळताभुई थोडी झाली. इतर प्राण्याची शिकार करणाऱ्या सिंहावर आता स्वत:चे प्राण वाचवण्याची वेळ आली होती.

होय हे खरं आहे, तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसत नसेल ना? मग हा व्हिडीओ पाहा.

ही घटना डेऑन केलब्रिक नावाच्या टूर गाईडने कॅमेऱ्यात कैद केली, जो पर्यटकांच्या एका गटासह त्याच्या सफारी कारमध्ये होता. या घटनेत सिंहाला काही जखमा झाल्या आहेत. पण या हल्ल्यातून सिंहाचा जीव वाचला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंह हा म्हशिंच्या कळपामध्ये अडकला आहे. ज्यामध्ये म्हशी एका मागून एक सिंहाला आपल्या शिंगाने उडवण्याचा आणि लांब फेकण्याचा प्रयत्न करत होते. सिंहाने देखील म्हशींना शिकार करण्याचा आणि आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते काही जमलंच नाही.

म्हशी एकामागून एक सिंहाला टार्गेट करत राहिल्या, अखेर सिंह एका झाडामागे पळाला.

सोशल मीडियावर या संदर्भात एक दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पहिल्या व्हिडीओचा दुसरा भाग आहे. त्यामध्ये सिंह झाडाच्या पाठी गेला असताना त्याला तेथून देखील हकलवण्याचा म्हशीच्या कळपाने प्रयत्न केला. तसे पाहाता म्हशी सिंहाला घाबरत देखील होत्या, पण तरी देखील आपल्या कळपातील म्हशींना वाचवण्यासाठी त्यांनी धाडसी पाऊल उचलून एकीचं बळ सिद्ध केलं आहे.

या क्लिपला इन्स्टाग्रामवर भरभरुन व्ह्यूज मिळाले आहेत. सिंहाचा हस्तक पाहून लोक हैराण झाले. मात्र, सिंह सुरक्षित असल्याची माहिती टूर गाईडने दिली आहे. पण त्याला झालेल्या जखमांमूळे त्याची हालत खूपच गंभीर आहे असं देखील गाईडने सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Videos viral, Viral, Wild animal, Wild life