मुंबई २७ नोव्हेंबर : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजाना आहे. असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण खरंच इथे इतके व्हिडीओ असतात की ते पाहण्यात संपूर्ण दिवस घालवाल, पण ना तुमचं मन भरणार ना ते व्हिडीओ संपणार. येथे कॉमेडी, आर्ट, वाईल्ड लाईफ, सायन्स, फुड फॅशन सारखे असंख्य व्हिडीओ आहेत. जगात प्राणी प्रेमींची कमी नाही. लोकांना वाईल्ड लाईप संदर्भात व्हिडीओ पाहायला आवडतात, असे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो धोकादायक आहे. हे ही पाहा : अजगराचा हरणारा विळखा, खेळ खल्लास होणार इतक्यात… थरारक घटनेचा Video Vira l हा व्हायरल व्हिडीओ मगर आणि साप यांचा आहे. पाण्याच्याकाठी आलेला साप आणि मगरीमध्ये जे काही घडतं, ते पाहातान भीतीदायक वाटत आहे. साप हा जमिनीवरील सर्वात धोकादायक प्राणी मानला जात असला तरी मगरीला पाण्याचा राजा असेही म्हटले जाते. त्यामुळे दोघांना ही कोणताही प्राणी त्रास देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल. पण जर हेच दोन प्राणी आपापसात भांडले? या दोघांमध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही एकदा पाहा, हा व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल
या व्हिडीओमध्ये एक साप पाण्याच्या किनाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. हा साप आकाराने मोठा आहे. तेव्हा त्याच्या जवळ मगर येते आणि ती डोळ्यांची पापाणी लवते न लवते तोच सापावर हल्ला करते आणि आपल्या तोंडाने पकडते. पण कितीही झालं तरी सापच तो… त्याने देखील वाचण्याचे अनेक प्रयत्न केले. ज्यामुळे मगरीला त्याला पकडण्यासाठी आणि तोंडात धरुन ठेवण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले. या हल्ल्यासाठी साप अजिबात तयार नव्हता. अशा परिस्थितीत तो मगरीच्या तावडीत सापडाच, ज्यामुळे त्याची शिकार झाली आणि मगरीला आपलं भक्ष्य मिळालं. या लढाईत तर मगर जिंकली आहे. पण प्रत्येक वेळेला मगरीचं नशिब इतकं चांगलं असेलंच असं नाही. कारण सापाला फारसं काही करण्याची गरज नाही, त्याचा एक दंश मगरीला शांत करण्यासाठी पुरेसं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. या खतरनाक व्हिडीओने लोक थक्क झाले आहेत. या व्हिडिओकडे पाहून हे स्पष्ट होतं की जंगलाचा एकच नियम आहे, जो सर्वात शक्तिशाली आहे, तोच आयुष्याच्या लढाईत जिंकू शकतो.