मराठी बातम्या /बातम्या /Viral /सिंहीणीच्या तावडीत अडकला, पण मृत्यूला चकमा देऊन परतला... पाहा Viral Video

सिंहीणीच्या तावडीत अडकला, पण मृत्यूला चकमा देऊन परतला... पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

शिकाऱ्याचा असा काही गेम झाला की, सिंहीणीच्या तावडीत सापडून देखील काळवीटाचे प्राण वाचले.

मुंबई 17 ऑक्टोबर : लोकांना प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ पाहायला फारच आवडते आणि सोशल मीडियावर यासंबंधीत आपल्या खूप व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी शिकार, तर कधी एखाद्या सुंदर क्षणांचे असतात. जे लोकांना पाहायला आवडतात. आपल्याला तर हे माहित आहे की सिंह हा जंगलाचा राजा आहे. तसेच तो एक धोकादायक शिकारी देखील आहे. ज्यामुळे सगळे प्राणी त्याच्यापासून लांबच राहातात. कारण एकदा का त्याने कोणाला टार्गेट केलं, तर खेळ खल्लास...

परंतू सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत काहीसं वेगळं पाहायला मिळालं आहे. कारण सिंहीणीच्या तावडीत सापडून देखील काळवीटाची शिकार झालीच नाही. हो हे खरं आहे.

आता असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात देखील उत्सुक्ता निर्माण झाली असेल की, हे कसं शक्य आहे? तर यासाठी एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहा

हे ही पाहा : डोक्यावर हेल्मेट घालून बकरीवर स्वार झाला, स्टाईल मारणारा चिमुकला काही क्षणात 'गार' झाला... मजेदार Video

ते म्हणतात ना की, नशिब बलवत्तर असेल तर मग कोणीही तुमचं वाकडं करु शकणार नाही. तसंच काहीसं या काळवीटासोबत घडलं

हरणासारखा दिसणारा हा काळवीट जवळपास मृत्यूच्या कचाट्यात सापडला होता. एक सिंहिण त्याच्या जवळ आली आणि तिने काळवीटाला चांगलंच पकडून ठेवलं. परंतू आपल्या मजबूत आणि धारधार शिंगांचा योग्य वापर करुन त्याने आपली सुटका करुन घेतली. हा पूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हरणाने अचानक सिंहीणीवर हल्ला केला

इंस्टाग्रामवर 'द डार्क साइड ऑफ नेचर' नावाच्या हँडलद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिंहाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी एका काळवीट आपल्या शिंगांचा वापर करताना दिसला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'सर्वोत्तम आक्रमण म्हणजे चांगला बचाव.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्लिपमध्ये एक सिंहीण एका काळवीटावर उडी मारताना दिसत आहे, ज्यानंतर काळवीट आपल्या शिंगांणी सिंहीणीला पळवून लावतो, ज्यानंतर अखेर सिंहीणीवरच आपला जीव वाचवण्याची वेळ येते आणि ती तेथून पळ काढते.

लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. तसेच अनेक लोक या व्हिडीओमधून खूपच शिकण्यासारखं असल्याचं देखील म्हणत आहेत. आपण कोणापेक्षाही कमी आहोत हा विचार जेव्हा आपण आपल्या मनातून काढून टाकतो तेव्हाच आपण स्वत:साठी काहीतरी करु शकतो. असं अनेकांचं म्हणणं आहे आणि ते खरं देखील आहे.

First published:

Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral