मुंबई : सोशल मीडियावर व्हिडीओंची कमी नाही, इथे दररजो हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. लोक आपल्या आवडी प्रमाणी व्हिडीओ पाहातात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात तर कधी प्राण्यांशी संबंधीत. मजेदार किंवा थरारक शिकारीचे. ज्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला प्राणांशीसबंधीत अशा काही गोष्टी पाहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणं ही झालं असतं कठीण. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलं आहे, जो जिराफ आणि सिंहीणीशी संबंधीत आहे. बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला आपल्याला तर हे माहित आहे की शिकार करणारे हे प्राणी खूपच ताकदवर असतात, त्यामुळे त्यांनी जर एखाद्याला टार्गेट करण्याचा विचार केला तर त्या प्राण्या खेळ खल्लासच समजावा. हे प्राणी सहसा कोणाला घाबसताना दिसत नाही, मात्र या व्हिडीओ काही वेगळंच पाहायला मिळालं. या व्हिडीओ सिंहीण चक्क जिराफला घाबरुन पळताना दिसली. नक्की काय घडलं? व्हिडीओच्या सुरुवातीला सिंहीणीच्या तावडीत जिराफचं एक पिल्लू लागलं, ज्याला टार्गेट करण्याचं सिंहीणीनं ठरवलं. सिंहीणीने जिराफच्या पिल्लावर हल्ला केलाच होता, तितक्या मागून मादा जिराफ धावत आली, जे पाहून अखेर जंगलाच्या राणीला म्हणजेच सिंहीणीला तेथून धूम ठोकावी लागली. इतक्या मोठ्या जिराफ समोर आपलं काहीच चालणार नाही, शिवाय त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते हे सिंहीणीने ओळखलं. ज्यामुळे ती तेथून पळून गेली असावी.
हा व्हिडीओ animal.worlds11 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोकांनी अनेकदा पाहिलं आहे आणि कमेंट्स देखील केल्या आहेत.