• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कोर्टाच्या आदेशानंतर पत्नीच्या इच्छेनुसार हॉस्पिटलनं घेतले गंभीर रुग्णाचे स्पर्म; काही तासातच घडलं विपरीत

कोर्टाच्या आदेशानंतर पत्नीच्या इच्छेनुसार हॉस्पिटलनं घेतले गंभीर रुग्णाचे स्पर्म; काही तासातच घडलं विपरीत

'माझे पती मृत्यूशय्येवर आहेत. मात्र मला त्यांचं मुलं हवं आहे', अशी मागणी एका महिलेने (Wife Wanted Child from Husband's Sperm) केली होती. न्यायालयानंही कोरोनाच्या या गंभीर अवस्थेतील रुग्णाचे स्पर्म घेण्यास परवानगी दिली.

 • Share this:
  गांधीनगर, 23 जुलै: 'माझे पती मृत्यूशय्येवर आहेत. मात्र मला त्यांचं मुलं हवं आहे', अशी मागणी गुजरात हायकोर्टात एका महिलेने (Wife Wanted Child from Husband's Sperm) केली होती. गुजरात उच्च न्यायालयानंही कोरोनाच्या या गंभीर अवस्थेतील रुग्णाचे स्पर्म घेण्यास परवानगी दिली. मात्र, यानंतर काही तासातच या व्यक्तीचा मृत्यू (Man Died Within Hours After Collection Sperm) झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीच्या पत्नीनं न्यायालयात याचिका दाखल करत मातृत्व सुखाची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर कोर्टाने रुग्णालयाला या व्यक्तीचे स्पर्म घेण्याचे आदेश दिले होते. रुग्णालय प्रशासनानं सांगितलं, की संबंधित रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. त्यांना 10 मे रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर वडोदराच्या स्टर्लिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा व्यक्ती तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या विळख्यात आल्यानंतर बायलेटरल निमोनियामुळे ग्रस्त होता. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत रुग्णालयानं बुधवारी टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रेक्शन मेथडच्या माध्यमातून रुग्णाचे स्पर्म जमा करून घेतले आणि शहरातील IVF लॅबमध्ये संरक्षित केले होते. राज कुंद्राविरोधात जवाब दिलेल्या अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी काय आहे प्रकरण - महिलेनं न्यायालयात IVF प्रक्रियेसाठी ART ची मंजुरी मागितली होती. महिलेनं कोर्टात याचिका दाखल करत म्हटलं होतं, की 'मी माझ्या पतीकडून माृत्तव सुख मिळवू इच्छिते, मात्र कायदा याची परवानगी देत नाही. आमच्या प्रेमाची शेवटची निशाणी म्हणून मला पतीचा अंश असलेलं मुलं हवं आहे, डॉक्टरांनी सांगितलं की, माझ्या पतीकडे खूप कमी वेळ आहे. तो व्हेंटिलेटरवर आहे.'('My husband is dying. But I want his children') मंगळवारी जेव्हा हे प्रकरण कोर्टासमोर आलं तेव्हा न्यायालयातील सर्वजण काही वेळासाठी हैराण झाले. मात्र महिलेचं तिच्या पतीवर इतकं प्रेम आहे की, कायद्याचा सन्मान करीत तिने कोर्टाकडून पतीचे स्पर्म घेण्याची परवानगी मागितली. साताऱ्यात घरांवर दरड कोसळली, 7 ते 8 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती कोर्टाच्या मंजुरीनंतर स्टर्लिंग रुग्णालय तातडीने तयार झालं. त्यांनी सांगितलं की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. यानंतर त्यांनी या व्यक्तीचे स्पर्म घेतले. मात्र, काही तासांनंतरच महिलेच्या पतीचा मृत्यू झाला.
  Published by:Kiran Pharate
  First published: