नवी दिल्ली 19 जानेवारी : नवरा आणि बायकोमध्ये भांडण (Dispute Between Husband and Wife) सुरूच असतं. कारण अनेकदा त्यांच्या सवयी एकमेकांपेक्षा भरपूर वेगळ्या असतात. मात्र, याचा असा अर्थ नाही की आपल्या पतीचा बदला घेण्यासाठी त्याची ऑनलाईन निलामी केली जावी. न्यूझीलंडमधील एका महिलेनं असंच केलं. तिने तिच्या पतीसाठी एक सेलिंग प्रोफाइल तयार करून जाहिरात बनवली आणि ती ट्रेडिंग साइटवर टाकली (Wife Listed Husband for Sale).
नवऱ्याला 'मर्द' बनवण्यासाठी बायकोचा खतरनाक प्रयोग; प्रायव्हेट पार्टची लावली वाट
पतीच्या हिंडण्याच्या सवयीमुळे त्रस्त असलेल्या लिंडा मॅकअलिस्टर नावाच्या महिलेने हे पाऊल उचललं, ज्याची पतीने स्वप्नातही कल्पना केली नसेल. नवरा घरात नसताना पत्नीने त्याला विकण्याची सर्व व्यवस्था केली. त्याची एक लांबलचक प्रोफाइल बनवली आणि एका फोटोसोबत 'Used Condition' टॅग लावून नवरा विक्रीसाठी ठेवला.
लिंडा हिने आपला पती जॉन याच्यासोबत असं यामुळे केलं कारण त्यांच्या मुलांना सुट्ट्या होत्या आणि त्यांना सांभाळायचं सोडून जॉन घराबाहेर फिरत होता. Stuff सोबत बोलताना लिंडाने सांगितलं की जॉनला फिरायला आवडतं. मात्र मुलांना सुट्टी असतानाही तिच्या मदत करण्याऐवजी तो न सांगताच घरातून बाहेर गेला. साल 2019 मध्ये या कपलने लग्न केलं आणि त्यांची दोन मुले आहेत. तिचा पती अतिशय मस्ती करणारा असून पत्नीने दिलेली ही जाहिरात पाहून तो खळखळून हसला.
लिंडाच्या जाहिरातीमध्ये जॉनला Trade Me वर ‘Husband for Sale’ या लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात सांगितलं गेलं आहे, की त्याची उंची 6 फूट 1 इंच असून तो 37 वर्षाचा आहे. तो एक शेतकरी आहे. आधीपासून त्याचे अनेक मालक असून त्याचा आहार चांगला असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच त्याच्या कंडिशनमध्ये तो वापरला गेला असल्याचं लिहिलं आहे. हेदेखील सांगण्यात आलं आहे, की कोणाला त्याला खरेदी करायचं असेल तर फ्री शिपिंगची व्यवस्था आहे. ही जाहिरात आता Trade Me ने आपल्या साईटवरुन हटवली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.