जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! पत्नीच्या डोळ्यांसमोर तिच्या मैत्रिणीला KISS करू लागला पती; अन् मग...

Shocking! पत्नीच्या डोळ्यांसमोर तिच्या मैत्रिणीला KISS करू लागला पती; अन् मग...

Shocking! पत्नीच्या डोळ्यांसमोर तिच्या मैत्रिणीला KISS करू लागला पती; अन् मग...

महिलेला समजलं की तिचा पती तिची फसवणूक करत (Cheating Husband) आहे आणि त्याला घटस्फोट घ्यायचा आहे. या गोष्टीमुळे ती चिंतेत होती. अखेर तिने आपल्या नात्याला नवी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पतीचा मूड ठीक करण्यासाठी त्याला पार्टीत घेऊन गेली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 एप्रिल : पती-पत्नीचं नातं (Husband Wife Relation) हे अतिशय वेगळं आणि खास असतं. यात कधी प्रेम असतं तर कधी भांडण होतं, पण कोणत्याही स्त्रीला तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीला आवडावा असं कधीच वाटत नाही. अशाच एका पार्टीत एका सुंदर महिलेनं आपल्या मैत्रिणीच्या पतीला डान्स (Dance with Friend’s Husband) करत असताना ओठावर किस केल्याने एकच गोंधळ उडाला. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, 31 वर्षीय महिला एका ऑफिसमध्ये काम करते. तिच्याचसोबत तिची जिवलग मैत्रिणही तिथेच काम करते. दोघीही कॉलेजपासूनच चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आता कंपनीतही एकत्र काम करत आहेत. महिलेचं लग्न झालं आहे, तर तिची मैत्रिणी अद्याप बॅचलर आहे. बेस्ट फ्रेंडसोबत लग्न ठरलं अन् नवरीच्या चेहऱ्यावरील भावच बदलला, Wedding Video Viral रिपोर्टनुसार, महिलेला समजलं की तिचा पती तिची फसवणूक करत (Cheating Husband) आहे आणि त्याला घटस्फोट घ्यायचा आहे. या गोष्टीमुळे ती चिंतेत होती. अखेर तिने आपल्या नात्याला नवी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पतीचा मूड ठीक करण्यासाठी त्याला पार्टीत घेऊन गेली. महिलेची मैत्रिणही तिथे आलेली होती. दारूच्या नशेत बेस्ट फ्रेंडने महिलेच्या पतीसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या पतीसोबत डान्स करताना ती हसत होती. त्यानंतर तिने महिलेच्या पतीला किस करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिला भडकली आणि तिने धक्का देऊन मैत्रिणीला आपल्या पतीपासून दूर केलं. यानंतर ती पतीसोबत पार्टीतून बाहेर निघाली. लग्नात आलेल्या पाहुण्यांसोबत नवरीचं धक्कादायक कृत्य; मंडपातून थेट तुरुंगात रवानगी या घटनेने दुखावलेल्या महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या मैत्रिणीने 13 वर्षांच्या मैत्रीचा विचारही केला नाही. दारूच्या नशेत असतानाही तिने असं करायला नको होतं. अशा परिस्थितीत, ती मैत्रिणीने केलेला विश्वासघात विसरू शकत नाहीये. ब्रिटनमध्ये या महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक तिला विविध सल्ले देत आहेत. एका यूजरने सांगितलं की, तुमची मैत्री खूप जुनी आहे. अशा परिस्थितीत मैत्रिणीने या मैत्रीचा आदर करायला हवा होता. दुसर्‍या वापरकर्त्याने असं सुचवलं की घटनेच्या वेळी मैत्रीण दारूच्या नशेत होती. त्यामुळे या गोष्टीसाठी 13 वर्षांची मैत्री संपवणं योग्य ठरणार नाही. आणखी एका युजरने सल्ला दिला की, महिलेनं तिच्या मैत्रिणीशी स्पष्ट बोलून आपली नाराजी सांगावी. तसंच, यावेळी हेही स्पष्ट कर की फक्त आपल्या मैत्रिणीमुळे मी तुला एक संधी देत आहे. अशी घटना पुन्हा घडली तर ही मैत्री कायमची संपेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात