जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नात आलेल्या पाहुण्यांसोबत नवरीचं धक्कादायक कृत्य; मंडपातून थेट तुरुंगात रवानगी

लग्नात आलेल्या पाहुण्यांसोबत नवरीचं धक्कादायक कृत्य; मंडपातून थेट तुरुंगात रवानगी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नवरी डॅन्या ग्लेनी आणि तिच्या लग्नात जेवणाची व्यवस्था करणाऱ्या जोसेलिन ब्रायंटला पोलिसांनी अटक केली आहे. 19 फेब्रुवारीला डॅन्याचं लग्न झालं मात्र याच आठवड्यात तिला आणि तिच्या केटररला अटक करण्यात आली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 एप्रिल : लग्न हा असा प्रसंग असतो ज्यात लोक भरपूर मजा मस्ती करतात. या दरम्यान नवरी आणि नवरदेव दोघांकडूनही भरपूर धम्माल केली जाते. आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं ही प्रत्येक वधू-वरांची इच्छा असते. घरी आलेले पाहुणे खूप आनंद राहातात आणि सर्वजण आनंदाने निघून जातात. पण फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं आपलं लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या लग्नाला आलेले पाहुणे कंटाळू नयेत म्हणून तिने सगळ्यांच्या जेवणात भांग मिसळली (Bride Mixed Cannabis in Food). गर्लफ्रेंडने दिलं अतिशय विचित्र गिफ्ट; पाहताच सरकली तरुणाच्या पायाखालची जमीन नवरी डॅन्या ग्लेनी आणि तिच्या लग्नात जेवणाची व्यवस्था करणाऱ्या जोसेलिन ब्रायंटला पोलिसांनी अटक केली आहे. 19 फेब्रुवारीला डॅन्याचं लग्न झालं मात्र याच आठवड्यात तिला आणि तिच्या केटररला अटक करण्यात आली (Police Arrested a Bride). एनबीसी न्यूजनुसार, त्यांच्यावर लोकांना न कळवता त्यांच्या जेवणात भांग मिसळल्याचा आरोप आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना जेवणात भांग मिसळल्याची माहिती नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे हे अन्न खाल्ल्यानंतर अनेकजण आजारी पडले. सेमिनोल काउंटी शेरीफच्या ऑफिसने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की लग्नाला अनेक पाहुणे आले होते. यापैकी सुमारे 50 जणांनी अन्न खाल्ल्यानंतर तब्येत बिघडल्याच्या तक्रारी केल्या. जेवण मीटबॉल्स, सीझर सॅलड, ऑलिव्ह ऑइलसह ब्रेड आणि हर्ब डीपसोबत दिलं गेलं होतं. अनेक पाहुण्यांची जेवण खाल्ल्यानंतर पोटात दुखू लागल्याने उलट्या होऊ लागल्याची तक्रार होती. भंगार झालेल्या बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी! या लग्नाला आलेल्या मिरांडा काडी या पाहुणीने सांगितलं की, जेवण खाताच तिला हृदयविकाराचा झटका आल्यासारखं वाटू लागलं. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि घरी जाण्यापूर्वी तिला गाडीतच झोप आली. गुप्तहेरांनी लग्नाच्या जेवणाची चाचणी केली असता त्यात गांजा मिसळल्याचं आढळलं. आता दोन महिन्यांनंतर पोलिसांनी वधू आणि तिच्या केटररला अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात